
राजस जोशी
आपण कष्ट घेऊन केलेल्या सजावटीमध्ये जेव्हा बाप्पा येऊन विराजमान होतात, तेव्हा घरात एक वेगळंच चैतन्य आणि पावित्र्य पसरतं. घरात बाप्पा असल्यामुळे प्रत्येक क्षण उत्साहाचा आणि आनंदाचा असतो. बाप्पांच्या नैवेद्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल सुरू होते. जेव्हा आपल्या हातानं केलेल्या सजावटीचं मित्रमंडळी कौतुक करतात, तेव्हा आपली कॉलर ताठ होते आणि केलेल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं.