

Ganesh festival naivedya recipes
esakal
सुप्रिया खासनीस
लाडक्या बाप्पाचे आगमन झाले की वातावरण प्रसन्न होते. घराघरांतून आरत्यांसाठी बोलावणे येते. आरती संपल्यानंतर आबालवृद्ध प्रसादाची वाट बघू लागतात. चविष्ट खिरापती व विविध मिष्टान्ने नैवेद्य म्हणून हातावर ठेवली जातात. अशाच काही प्रसादासाठीच्या मिष्टान्नांच्या पाककृती...
साहित्य
एक वाटी उकडलेल्या बटाट्याचा लगदा, अर्धी वाटी खोवलेले ओले खोबरे, अर्धी वाटी दूध, ५ ते ६ वेलदोड्यांची पूड, थोडी जायफळ पूड,
२ वाट्या साधी साखर, अर्धी वाटी पिठीसाखर.
कृती
बटाट्याच्या लगद्यात ओले खोबरे, दूध, साखर, वेलची व जायफळाची पूड घालून एकजीव करावे व मिश्रण मंद आचेवर परतून घ्यावे. मिश्रण घट्ट होत आले, की थोड्या पाण्यात किंचित मिश्रण घालून पाहावे. मिश्रण पाण्यात विरघळले नाही, तर गॅसवरून खाली उतरवून चांगले घोटावे. मिश्रण कोमट झाल्यानंतर त्यात थोडी थोडी पिठीसाखर घालून एकसारखे करावे. गोळा घट्ट झाला, की तूप लावलेल्या ताटावर थापावा व त्याच्या वड्या पाडाव्यात. बटाट्याची बर्फी तयार.