
निखील नामदेवराव सुक्रे
दरवर्षी गणेशोत्सव आला की गावाचं चित्र डोळ्यासमोर तरळतं. त्याचं कारणही तसंच आहे. घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करणारी मित्रमंडळी थोडं थोडं करत मोठं कार्य करतात. खरंतर हे गावाचं तत्त्व म्हणायला हरकत नाही. बांबू-पाल वापरून गल्लीत टाकलेला छोटासा मंडप, लहानसहान पोरांनी साऊंडवर धरलेला ठेका, छोटा बँड... पण आनंद आभाळाएवढा... शहरात आल्यापासून हा आनंद पुन्हा पुन्हा शोधण्याची इच्छा होते. शहरात मोठा स्टेज, मोठा डीजे, ढोलपथकं आणि नाचणाऱ्यांची संख्याही जास्त असते. पण का कुणास ठाऊक, मन इथं रमत नाही.