Premium|Ganesh Chaturthi Muhurta: गणेशाची स्थापना कधी; काय आहे मुहूर्त? जाणून घेऊया पंचांगकर्ते ओंकार दाते यांच्याकडून..
ओंकार दाते
गणरायाची मूर्ती कशी असावी याचीही काही मापकं आहेत. आपण घरी आणतो ती गणेशमूर्ती जास्तीत जास्त एक वीतभर उंचीची आणि आसनस्थ असावी. समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे ‘सरळ सोंड, वक्रतुण्ड, त्रिनयना’ या वर्णनाला खरी उतरणारी मूर्ती आणणं हेच उत्तम! मूर्तीचे हात, पाय, डोळे, कान सुबक आहेत ना, याची खात्री करूनच मूर्ती घरी आणावी.
भारतातील लोककला, शिल्पकला, चित्रकला, साहित्य अशा सर्व कलाप्रकारांमध्ये गणपती सामावलेला आहे. तसंच आपल्याकडे प्रत्येक मंगलकार्याच्या सुरुवातीला गणरायाची आराधना करण्याची पद्धत आहे. गणपती आपलं सर्व काही व्यापून आहे. पूर्वीच्या काळी घराच्या दरवाजांच्या वरच्या बाजूला गणेशाची प्रतिमा असे, आजही काही ठिकाणी तशी प्रतिमा बघायला मिळते. इतकंच काय, आपल्या शिक्षणाला प्रारंभ होतो तोही ‘श्रीगणेशाय नमः’ करूनच. आपल्या जीवनात गणपतीचं स्थान अनन्यसाधारण आहे. आज गणेशोत्सव आपल्यापुरता मर्यादित राहिला नसून वेगवेगळ्या पद्धतीनं जगभर साजरा केला जातो.