Premium|Gen Z Career Trends : करिअरची नवी व्याख्या; जेन-झी आणि मिलेनियल्सचा बदलता दृष्टिकोन समोर

Deloitte Gen Z Survey : भारतातील जेन-झी आणि मिलेनियल्स केवळ चांगल्या पगारापेक्षा अर्थपूर्ण काम, मानसिक स्वास्थ्य, कौशल्यविकास आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर यांना करिअरमधील यशाचे नवे मापदंड मानत आहेत.
Gen Z Career Trends

Gen Z Career Trends

esakal

Updated on

जगातील कामगार शक्तीचे भवितव्य ठरणाऱ्या जनरेशन झेड (जेन- झी) आणि मिलेनियल्स यांच्या अपेक्षा, चिंता आणि प्राधान्यक्रम समजून घेण्यासाठी दरवर्षी होणारे ‘डेलॉइट ग्लोबल जेन झी आणि मिलेनियल सर्वेक्षण’ नुकतेच प्रकाशित करण्यात आले. या सर्वेक्षणातून सध्याची पिढी त्यांच्या शिक्षणाचा व आपल्या भविष्यातील नोकऱ्यांबाबत नक्की कसा विचार करते, हे समोर येते व त्यामुळेच हे सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. २०२५मध्ये घेण्यात आलेल्या या सर्वेक्षणात ४४ देशांतील २३ हजारांहून अधिक युवक-युवतींचा सहभाग होता. या अहवालातून स्पष्ट होते, की आजची तरुण पिढी केवळ चांगल्या पगाराच्या शोधात नाही, तर ‘पैसा, अर्थपूर्णता आणि मानसिक स्वास्थ्य’ या तिन्ही गोष्टींचा समतोल साधणाऱ्या करिअरचा शोध घेत आहे! विशेष म्हणजे, भारतातील जेन झी व मिलेनियल्सचा नेमका हाच विचार आहे.

भारतातील सर्वेक्षण वैशिष्ट्यपूर्ण

सर्वेक्षणातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतातील तरुणांच्या करिअरविषयक दृष्टिकोनात झालेला बदल. पूर्वीच्या पिढ्यांप्रमाणे उच्च पदांपर्यंत पोहोचणे हाच आता यशाचा एकमेव मापदंड राहिलेला नाही. जेन-झीमधील केवळ सहा टक्के युवकांनी वरिष्ठ नेतृत्वाच्या पदावर पोहोचणे हे ध्येय असल्याचे सांगितले. काम आणि वैयक्तिक जीवनातील समतोल, सतत शिकण्याच्या संधी आणि अर्थपूर्ण काम या पिढ्यांना अधिक महत्त्वाचे वाटते. भारतातील ९४ टक्के जेन-झी आणि ९७ टक्के मिलेनियल्सना करिअरमध्ये प्रगतीसाठी ‘ऑन-द-जॉब लर्निंग’ सर्वाधिक महत्त्वाचे वाटते. ही टक्केवारी जागतिक सरासरीपेक्षा अधिक आहे. याचा अर्थ भारतीय युवक पारंपरिक पदव्या किंवा प्रमाणपत्रांपेक्षा प्रत्यक्ष कामातून मिळणाऱ्या कौशल्यांना अधिक महत्त्व देत आहेत. यामागे उच्च शिक्षणाचा वाढता खर्च आणि तंत्रज्ञानामुळे बदलणाऱ्या कौशल्यांच्या गरजा ही कारणे दिसतात. त्यामुळे ‘आधी पदवी आणि नंतर नोकरी’ या पारंपरिक मॉडेलऐवजी ‘शिकत-शिकत काम’ हे मॉडेल लोकप्रिय होत आहे. भारतीय तरुणांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत भीतीपेक्षा उत्सुकता अधिक आहे. भारतातील ८५ टक्के जेन-झी आणि ८५ टक्के मिलेनियल्स आधीच आपल्या दैनंदिन कामात GenAI वापरत आहेत. ते कंटेंट निर्मिती, डेटा विश्लेषण, प्रकल्प व्यवस्थापन आणि डिझाइनसारख्या कामांसाठी ‘एआय’चा वापर करतात. सर्वेक्षणातील एक चिंताजनक निष्कर्ष म्हणजे, नेतृत्व आणि मार्गदर्शनाचा अभाव.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com