Premium|Gen Z Settling Down : 'सेटल' होणं म्हणजे नक्की काय? जेन-झी पिढीसाठी यशाची आणि सुखाची व्याख्या बदलतेय!

Youth Mental Health and Life Choices : वेळेत सेटल होण्याच्या पारंपरिक दडपणाला झुगारून जेन-झी पिढी आता मानसिक शांतता, पारदर्शकता आणि लवचिकतेला प्राधान्य देत असून, पालकांच्या अपेक्षा आणि मुलांचे स्वातंत्र्य यातील वैचारिक दरी अधिक रुंदावत असल्याचे सामाजिक चित्र दिसत आहे.
Gen Z Settling Down

Gen Z Settling Down

esakal

Updated on

डॉ. वैशाली देशमुख

मनाविरुद्ध पिळवटून जगणं जेन-झी नाकारायला बघते आहे. त्यांच्यासाठी सेटल होणं म्हणजे मानसिक शांतता, निवांतपणा देणारी नाती, पारदर्शकता, निर्णयांतली लवचिकता, आयुष्याची दिशा बदलण्याचं स्वातंत्र्य, सुखाची वैयक्तिक व्याख्या करता येणं. त्यासाठी त्यांना वेळेचं, वयाचं बंधन नको आहे. इतरांच्या अपेक्षांना पुरून उरायचं ओझं नको आहे. सेटल होणं त्यांच्यासाठी ऐच्छिक पर्याय आहे, अनिवार्य नव्हे!

मूल आठवीत असो की दहावीत; पदवी मिळालेली असो वा पदव्युत्तर अभ्यास झालेला असो; नोकरी अथवा व्यवसायाची सुरुवात झालेली असो; किंवा अगदी नुकतंच लग्न झालेलं असो, समांतरपणे काही प्रश्न इतरांना पडायला लागतात, ‘पुढे काय करायचं ठरवलं आहेस? कुठली साइड घेणार? सेटल कधी होणार आता? आता काहीतरी पैसे मिळवायचं बघा, म्हणजे लग्नाचं बघता येईल. मुलांचं काय ठरवलंय? वय उलटून चाललं आहे...’ आणि यातले बहुतेक प्रश्न जेन-झी टाळतात तरी किंवा त्यावर त्यांचं ‘बघू, अजून ठरवलं नाही, सांगतो/सांगते नंतर, काय घाई आहे’ असं काहीतरी संदिग्ध उत्तर तरी असतं. आठवीतल्या मुलानं जेईईचा क्लास लावायचा की नीटचा, आणि शिक्षण संपल्यावर आता नोकरीला लागून सुरळीत आयुष्य जगायला लागायला हवं का, हे त्यांना प्रश्न वाटत नसतातच मुळी, ते प्रश्न आई-बाबांना पडलेले असतात. वेळेवारी सगळं व्हायला हवं अशा मानसिकतेत वाढलेल्या पालकांच्या पिढीला साहजिकच फार त्रास होतो या दृष्टिकोनाचा.

Gen Z Settling Down
Premium| Bhumika Sachin Khedekar: 'भूमिका'नाटकातून सचिन खेडेकरांचं २१ वर्षांनी व्यावसायिक रंगभूमीवर पुनरागमन
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com