Premium|General Manoj Naravane's novel: सैन्यदलातील रहस्यकथा; जनरल नरवणे यांच्या 'द कॅन्टॉनमेंट कॉन्स्पिरसी'चा थरार

Military life: रहस्यमय थरारकथेच्या माध्यमातून सैनिकी जीवनाचे दर्शन
The Cantonment Conspiracy,
The Cantonment Conspiracy,Esakal
Updated on

डॉ. बाळ फोंडके

जनरल नरवणे यांनी चार दशकांहून अधिक काळात सैन्यदलात सर्वात कनिष्ठ अधिकार पदापासून सर्वोच्च पदापर्यंतचा प्रवास केला आहे. त्यामुळं त्यांनी घडवलेलं सैन्यदलातल्या जीवनाचं दर्शन अचूक आहे. त्यांनी वापरलेली भाषाही सैन्यात वापरल्या जाणाऱ्या त्रोटक तरीही मुद्देसूद भाषाशैलीतूनच विकसित झाली आहे. त्यात त्यांची चित्रदर्शी शैली सैन्यदलातलं जीवन डोळ्यांपुढं साकार करते. क्षणभर आपणही त्याच रेजिमेंटल सेंटरचा सदस्य असल्याची भावना वाचकाच्या मनात उत्पन्न करते. हे या कादंबरीचं यश आहे.

वरिष्ठ सैनिकी अधिकाऱ्यांनी निवृत्तीनंतर काही महत्त्वाचं लेखन केल्याची अनेक उदाहरणं आहेत. ती एकतर लेफ्टनंट जनरल शंकरराव मोहिते पाटील यांच्या फ्रॉम रेव्हेय टू रिट्रीट यासारखी आत्मचरित्रं तरी होती, किंवा भाग घेतलेल्या युद्धांच्या यशापयशाची चिकित्सा करणारी ब्रिगेडियर दळवी यांच्या द हिमालयन ब्लंडरसारखी वैचारिक आणि माहितीपूर्ण पुस्तकं तरी होती. पण कथा, कादंबरी, नाट्य यांसारख्या ललित लेखन प्रकाराचा अभाव होता. कोडनेमसारखं रंगभूमीवर गाजलेलं नाटक हे तर अ फ्यू गुड मेन या जॅक निकोलसन, टॉम क्रूज आणि डेमी मूर यांच्या सशक्त अभिनयामुळं गाजलेल्या हॉलिवूडच्या चित्रपटावरून घेतलेलं होतं. त्याचं भारतीयीकरण करताना त्यात दाखवलेली सैनिकांची जीवनकहाणी इथल्या सत्याशी कितपत प्रामाणिक होती, हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. भूतपूर्व भूदल प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी आपल्या द कॅन्टॉनमेंट कॉन्स्पिरसी या कादंबरीनं ती उणीव भरून काढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com