
भूषण महाजन
थ्री इडियट्स हा चित्रपट पाहिला नाही असा रसिक विरळाच! त्यात शर्मन जोशी आणि माधवन परीक्षेत कसेबसे पास होतात; त्यांना परीक्षेत स्वतःचा शेवटचा नंबर आल्याचे त्यांना झालेले दुःख आपल्या मित्राचा पहिला नंबर आल्याच्या दुःखापुढे अगदीच फिक्के वाटते. नेमके तसेच होते आहे. ब्रिटिश मार्केट्स बऱ्यापैकी खाली जाऊन पुन्हा सार्वकालीन उच्चांकाच्या जवळ जाऊ पाहताहेत.