Premium|Hasan Mushrif Political Future : गोकुळ-जिल्हा बँक रणधुमाळीत हसन मुश्रीफांची गुगली

Kolhapur Gokul Election : गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकांमुळे कोल्हापूरचे राजकारण तापले असताना हसन मुश्रीफ यांच्या केंद्रीय रेल्वेमंत्री होण्याच्या इच्छेने जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
Hasan Mushrif Political Future

Hasan Mushrif Political Future

esakal

Updated on

निवास चौगले

सध्या कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) व जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीने राजकीय वातावरण तापले आहे. अशा परिस्थितीत आता वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि गेली अनेक वर्षे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राहिलेल्या हसन मुश्रीफ यांनी लोकसभा निवडणूक लढवून केंद्रीय रेल्वे मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. प्रत्यक्षात त्यांनी २०२९ची विधानसभा आणि त्यानंतर पुढची लोकसभा लढणार असल्याचे म्हटले आहे, पण त्यांच्या या वक्तव्याने राजकीय चर्चेला मात्र उधाण आले आहे. मुश्रीफ यांचा पुढील प्रवास कसा राहील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

आ रोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी गाजलेल्या ‘गोकुळ’ची निवडणूक आता न्यायालयीन प्रक्रियेनंतर कुठेतरी मार्गावर आली असे वाटत आहे. या संस्थेवर २०२१पर्यंत आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ वर्चस्व होते. एकेकाळचे राजकीय मित्र असलेले काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील व महादेवराव महाडिक यांच्यातील राजकीय संघर्ष २००७मध्ये पुढे आला. या संघर्षाने टोक गाठले, त्यातून मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या, त्यात महाडिक यांच्या ताब्यात असलेल्या गोकुळवरच आमदार पाटील यांनी लक्ष केंद्रित केले. गोकुळच्या जोरावर महाडिक यांनी जिल्ह्याच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केला होता. त्यातून त्यांनी लोकसभा, विधानसभेत प्रभाव पाडला. या प्रभावाचा अनेकांना फटका बसला, तर अनेकांना त्यांचे सहकार्य झाले. आज जिल्ह्यात असा एकही नेता नाही ज्यांनी महाडिक यांची राजकीय मदत घेतलेली नाही. त्यामागे गोकुळची ताकद महत्त्वाची होती.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com