Premium|Impact of Quick Commerce : ‘गिग’ इकॉनॉमीची ‘बिग’ कथा

Consumer Behaviour and Quick Commerce : क्विक कॉमर्सने ग्राहकांचा वेळ वाचवला असला, तरी त्याने खरेदीच्या सवयी, गरजांची व्याख्या आणि त्वरित समाधानाची मानसिकता बदलली आहे. सुविधा आणि परिणाम यांचा समतोल महत्त्वाचा ठरत आहे.
Impact of Quick Commerce

Impact of Quick Commerce

esakal

Updated on

प्राची गावस्कर

रोजगाराची व्याख्याच बदलत आहे. एकेकाळी कायमस्वरूपी नोकरी म्हणजे सुरक्षित भविष्य, असे समीकरण होते. आज मात्र कौशल्य, तंत्रज्ञान, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि लवचिक कामकाज यांच्या आधारावर उभी राहिलेली गिग इकॉनॉमी रोजगाराचे नवे दालन उघडत आहे. स्वातंत्र्य, लवचिकता आणि कौशल्याला मिळणारे महत्त्व ही या व्यवस्थेची मोठी ताकद आहे; पण त्याचवेळी उत्पन्नाची अनिश्चितता आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव ही तिच्यासमोरची मोठी आव्हाने आहेत.

काही दिवसांपूर्वी आमच्याकडे स्वयंपाकासाठी येणाऱ्या मावशी त्यांच्या मुलाला बरोबर घेऊन आल्या. त्यांचा एम.कॉम. झालेला मुलगा संजय अलीकडेच पार्ट-टाइम काम करू लागला होता. मात्र, त्याने निवडलेले काम मावशींना फारसे पसंत नव्हते. माझ्या सांगण्याने तो कायमस्वरूपी नोकरीकडे वळेल, अशी त्यांची अपेक्षा होती. म्हणूनच त्या त्याला घेऊन माझ्याकडे आल्या होत्या.

घरामध्ये शिरताच संजयने नमस्कार केला आणि म्हणाला, ‘‘ताई, आईला समजवा ना. मी करत असलेले काम चांगले आहे. त्यातून चांगले उत्पन्न मिळते. आजकाल चांगल्या नोकऱ्या सहज मिळतात कुठे? एखाद्या नोकरीत आठ-दहा तास काम करून जितकी कमाई होईल, तितकी कमाई मी या कामातूनही करू शकतो. फरक एवढाच, की इथे कामाच्या वेळा मी स्वतः ठरवू शकतो. एखाद्या दिवशी काम करायचे नसेल, तर तो निर्णयही माझाच असतो. नोकरीत हे स्वातंत्र्य मिळत नाही आणि मला हे काम मनापासून आवडते.’’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com