भारतीय परराष्ट्र सेवेचे अंतरंग

गेल्या पन्नास वर्षात जगभरात घडलेल्या ह्या घटना रंजक तर आहेतच ,पण सामान्य वाचकाला पडद्यामागे काय काय घडत असते ह्याचेदेखील दर्शन घडवणाऱ्या आहेत.
the ambassador club book
the ambassador club bookSakal Saptahik

विक्रम अवसरीकर

अनेक दशकांचा अनुभव, प्रतिकूल परिस्थतीतून मार्ग काढण्याचे कसब, उपलब्ध साधनसामग्रीचा कार्यक्षमतेने वापर करून घेण्याचे कौशल्य, उघडउघड दिसणाऱ्या घटनांमागच्या न दिसणाऱ्या कारणांचा देशहितासाठी करून घेतलेला चतुर उपयोग ह्यांची एक उत्तम झलक ‘दी अँबेसिडर्स क्लब’ ह्या लेखसंग्रहातून मिळते. नवीन अनुभव, वेगवेगळ्या संस्कृतीची ओळख आणि देशासाठी काम करण्याच्या सुवर्णसंधी ह्या तिन्ही संधी एकत्र मिळण्याच्या शक्यता फारच थोड्या असतात. त्यातलीच एक संधी म्हणजे मुत्सद्दी म्हणून कारकीर्द घडवण्याचे भाग्य.

‘दी अँबेसिडर्स क्लब –दी इंडियन डिप्लोमॅट अॅट लार्ज’ हे पुस्तक गेल्या चार दशकांमध्ये घडलेल्या काही आंतरराष्ट्रीय घटना भारताच्या विविध देशांमधील राजदूतांनी आणि वकिलातींनी कशा हाताळल्या ह्याचे दर्शन घडवते.

the ambassador club book
Sakal Podcast : चांद्रयान ३ची भरारी ते खातेवाटपाचा तिढा कायम

अतिशय व्यावसायिक पद्धतीने आपली कामे पूर्णत्वाला नेऊन भारताची सेवा करणाऱ्या ह्या अधिकाऱ्यांच्या ह्या हकिगती म्हणजे आधुनिक इतिहासाचाच भाग आहे. गेल्या पन्नास वर्षात जगभरात घडलेल्या ह्या घटना रंजक तर आहेतच ,पण सामान्य वाचकाला पडद्यामागे काय काय घडत असते ह्याचेदेखील दर्शन घडवणाऱ्या आहेत.

सामान्य नागरिकांच्या मनात परराष्ट्र सेवा म्हणजे (बव्हंशी वेळा केवळ ऐकीव माहितीवर आधारलेली) अगदी ठरावीक दृश्ये डोळ्यांसमोर उभी राहू लागतात. पण प्रत्यक्षात परराष्ट्र व्यवहार आपल्या त्या कल्पनांच्या कितीतरी पलीकडे असतो, हे परराष्ट्र खात्यात प्रत्यक्ष काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आठवणी वाचताना कायमच जाणवते. राष्ट्रा-राष्ट्रांमधील व्यवहारांतील कित्येक गुपित गोष्टी, घटना, संभाषणे जशी कधीच प्रकाशात येत नाहीत (तशी ती आणायचीही नसतात), उघडकीला येत नाहीत तसेच त्यासाठी अहोरात्र काम करणारे परराष्ट्र सेवेतील अधिकारीही कधीच फारसे प्रकाशात येत नाहीत.

the ambassador club book
Sakal Exclusive : सोशल मीडियावर अहिराणी गाण्यांची ‘क्रेज’; हिंदी आणि मराठी गाणीही ‘फेल’...

अन्य काही भारतीय प्रशासकीय सेवांमधील अधिकाऱ्यांचे काम आपल्या डोळ्यासमोरच असते. उदाहरणार्थ, एखादे पोलिस अधीक्षक किंवा जिल्हाधिकारी वगैरे. परराष्ट्रसेवेतील लोकांच्या कामगिऱ्या परदेशात, आपल्या नजरेच्या टप्प्यापलीकडे, घडत असल्याने आणि आधी म्हटले तसे गुप्ततेच्या आवरणात दडलेल्या असल्याने त्यापैकी अनेक कामगिऱ्यांचे महत्त्व अनेकदा थेट आपल्यापर्यंत पोहोचत नाही. परराष्ट्र सेवेतील लोकांसमोर उभी ठाकलेली आव्हाने फारच वेगळी असतात. प्रत्येक क्षणी आपल्या देशाचे हित आणि इतरही अनेक गोष्टींचे अवधान ठेवत त्यांना आपली कामे पूर्ण करायची असतात.

आपल्या राजदूतांनी बजावलेल्या काही कामगिऱ्यांवर प्रकाश टाकणारे हे पुस्तक आहे ‘दी अँबेसिडर्स क्लब - दी इंडियन डिप्लोमॅट अॅट लार्ज.’ पुस्तकाचे संपादक कृष्ण व्ही. राजन हे स्वतः अतिवरिष्ठ मुत्सद्दी. परराष्ट्र सेवेतून निवृत्त होण्यापूर्वी त्यांनी नेपाळ, फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन अशा देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केले आहे. स्वतःच्या व्यावसायिक कर्तृत्वाचे नवीन मापदंड निर्माण करणाऱ्या सोळा राजदूतांच्या कहाण्या राजन यांनी संपादित केलेले हे पुस्तक आपल्यासमोर मांडते.

the ambassador club book
Sakal Podcast :प्रदीप कुरुलकरचे चॅट्स उघड ते अजितदादांसाठी फडणवीस अर्थखातं सोडण्याची शक्यता

सत्तरीचे दशक सुरू होताना युगांडातील हुकूमशहा ईदी अमिनने सर्व आशियायी नागरिकांनी तीन महिन्यांच्या आत युगांडा सोडून जाण्याचे फर्मान काढल्यावर तिथे अडकलेल्या भारतीयांना मदत करायला जाणाऱ्या निरंजन देसाई ह्यांची कहाणी आपल्याला तिथे अडकलेल्या भारतीयांची अवस्था तर सांगतेच, पण त्यांना मदत करतानाच अतिशय कौशल्याने काम केल्यामुळे त्यांनाच युगांडा शासनाने ‘नको असलेली व्यक्ती’ म्हणजे ‘पर्सोना नॉन ग्राटा’ म्हणून का जाहीर केले ह्यावरही प्रकाश पडतो.

१९८७ मध्ये फिजीमध्ये झालेल्या उठावादरम्यान भारत सरकारने आपल्या परराष्ट्रीय सेवेचा तेथील भारतीयांच्या मदतीसाठी कसा उपयोग करून घेतला, ह्याबद्दल टी.पी. श्रीनिवासन सांगतात. उघड उघड बनाव असलेल्या निवडणुका, सत्ताबदल, सैन्याची बंडखोरी, बाहेरच्या देशांशी व्यापार करण्यावर असलेले निर्बंध अशा अनेक गोष्टी जगभरात त्या त्या काळात घडत असतात. मात्र फिजीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळेस घडत होत्या. त्यातून मार्ग काढताना श्रीनिवासन ह्यांचा कस लागला होता.

the ambassador club book
Sakal Podcast :ब्रिजभूषणसिंहवर आरोपपत्र दाखल ते बारामतीत अमेठी पॅटर्न राबवणार का?

केनियाचे तत्कालीन राष्ट्रपती जोमो केन्याटा ह्यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी (१९७८) त्यावेळचे भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख झिया-उल-हक ह्यांची अचानक भेट झाली होती. ह्या दोन्ही नेत्यांमध्ये काही एका पातळीपर्यंत मैत्रीचे संबंध निर्माण झाल्याची आठवण आदित्य नारायण धैर्यशील (एएनडी) हक्सर यांच्या आठवणीत वाचायला मिळते. त्याकाळात दोन्ही देशांच्या संदर्भाने घडलेल्या काही घटनाही हक्सर आपल्या लेखात उलगडतात.

ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस बर्लिनची भिंत पाडून जर्मनीचे एकत्रीकरण होऊ नये म्हणून इंग्लंडच्या त्यावेळच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर ह्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष गोर्बाचेव्हना पत्र लिहून सैनिकी हस्तक्षेपाची मागणी केली होती, याची आठवण त्यावेळी ब्रिटनमध्ये नियुक्त असणारे ए. माधवन सांगतात. जगाच्या पटलावर नव्याने उदयाला येणाऱ्या एकत्रित जर्मनीच्या परराष्ट्र धोरणात भारताला प्राधान्य मिळावे म्हणून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि परराष्ट्र मंत्री नरसिंह राव ह्यांच्या पाठिंब्याने काय काय केले हे माधवन यांचे ‘द वॉल कम्स डाऊनः अॅन इंडियन व्ह्यू’ हे प्रकरण वाचताना लक्षात येते.

the ambassador club book
SAKAL Impact: तोरंगण पाड्यावर चिरांचे बनवले स्मारक! चौदाशेच्या शतकांच्या 20 चिरांचे संवर्धन

भूतानबरोबर सबंध वाढवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उतार वयात खेचरावरून केलेला प्रवास, भारताने नेपाळला स्वतंत्र राष्ट्र म्हणून दिलेली मान्यता, चीनबरोबरचे १९६२ युद्ध आणि त्याकाळातल्या परराष्ट्रनीतीचे अनेक तपशील ए.एन. राम, राजन आणि बी.एस. दास अशा तिघांच्या आठवणीत आलेले आहेत. नेपाळच्या राजवंशाची झालेली हत्या, श्रीलंकेतील शांतीसेना, सिक्कीमचे भारतातील विलीनीकरण ह्या मागची कारणमीमांसा तसेच या काळातील काही घटिते टाळता आली असती का? हा प्रश्न आपल्याला पुस्तकातले लेख वाचताना पडतो.

त्यांच्या कारकिर्दीत घडलेल्या, त्या त्या वेळी इतिहासाला कलाटणी देणाऱ्या घटना हे सारे मुत्सद्दी रंजकपणे वाचकांसमोर मांडतात. माजी पंतप्रधान नरसिंह राव यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून काम करताना किती चलाखीने भारताच्या परराष्ट्र व्यवहारात बदल घडवून आणला त्याबद्दल प्रभाकर मेनन यांनी ‘द क्वाएट इनोव्हेटर’ या प्रकरणात विस्ताराने लिहिले आहे.

पडद्यामागच्या घडामोडींचा प्रत्यक्ष घटनांवर कसा परिणाम होत असतो ह्याचे अनोखे दर्शन आपल्याला ह्या लेखसंग्रहात घडते. पडद्यामागे घ्यावे लागणारे कष्ट आणि त्या कष्टांचे सार्वजनिकरित्या कौतुक होणार नाही ह्याची पूर्ण जाणीव असताना या सर्व अधिकाऱ्यांना दाखवलेली व्यावसायिक निष्ठा ह्यांचे लखलखीत दर्शनही आपल्याला होते.

the ambassador club book
Sakal Podcast : मोदी पवार एका मंचावर येणार का? ते हिमाचलमध्ये पावसाचा हाहा:कार

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे महत्त्व वाढत असताना भारताने इतर देशांत स्थायिक असणाऱ्या भारतीयांबाबत काय भूमिका घेतली पाहिजे, जगाच्या काही भागांत वंशद्वेषातून भारतीयांवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी काय करावे लागेल, भूतकाळातील या साऱ्या घटनांमधून वर्तमानात भारताने काय बोध घ्यावा आणि भारताची सौम्य शक्ती जगभरात कशी वाढेल ह्या विचारांचे संचित आपल्याला ह्या पुस्तकातून मिळते.

अनेक दशकांचा अनुभव, प्रतिकूल परिस्थतीतून मार्ग काढण्याचे कसब, उपलब्ध साधनसामग्रीचा कार्यक्षमतेने वापर करून घेण्याचे कौशल्य, उघडउघड दिसणाऱ्या घटनांमागची न दिसणाऱ्या कारणांचा देशहितासाठी करून घेतलेला चतुर उपयोग ह्यांची एक उत्तम झलक आपल्याला ह्या संग्रहातून मिळते.

हे पुस्तक वाचताना मुत्सद्देगिरीची भारतीय अशी काही शैली आहे का? असा प्रश्न आपल्याला पडतो, आणि अशी एक शैली निश्चितपणे उदयाला येते आहे असे मला वाटते, असे माजी परराष्ट्र सचीव शिवशंकर मेनन यांनी या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत म्हटले आहे; त्याची प्रचिती वाचक म्हणून आपल्यालाही येत राहते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com