Indian Hockey : हॉकीला खुणावतंय गतवैभव

World Level Championship in Hockey : जागतिक क्रमवारीत भारतीय हॉकीने पाचव्या स्थानापर्यंत मजल मारली असून एकंदरीत, २०२३-२०२४मध्ये भारताचा हॉकीत दबदबा दिसत आहे
indian hockey team
indian hockey team esakal
Updated on

किशोर पेटकर

२०२३-२०२४मध्ये भारताचा हॉकीत दबदबा दिसून येत आहे. हांग चौऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकले, गतवर्षी व यंदा आशियाई चँपियन्स ट्रॉफी पटकावली. ऑलिंपिक ब्राँझपदकाचीही कमाई केली. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानापर्यंत मजल मारली आहे.

भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिंपिकनंतर पॅरिस ऑलिंपिकमध्येही ब्राँझपदक जिंकले. आणि आता भारतीय हॉकी संघाने सहा देशांची आशियाई चँपियन्स ट्रॉफी जिंकताना आपला राष्ट्रीय खेळ असलेला हॉकी गतवैभवाच्या दिशेने झुकत आहे, हे दाखवून दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com