Premium|FIFA World Cup Indian Origin Players : विश्‍वकरंडकात चमकणार भारतीय वंशाच्या चार फुटबॉलपटूंचे कौशल्य

Players With Indian Roots In World Cup : भारत विश्‍वकरंडकासाठी पात्र ठरत नसला तरी भारतीय वंशाचे चार फुटबॉलपटू यंदाच्या स्पर्धेत विविध देशांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्या कामगिरीमुळे भारतीय फुटबॉलप्रेमींना जागतिक स्तरावर अभिमानाची संधी मिळणार आहे.
Players With Indian Roots In World Cup

Players With Indian Roots In World Cup

esakal

Updated on: 

यावेळच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत काही भारतीय वंशाचे खेळाडू कौशल्य प्रदर्शित करताना दिसतील. भारतीय वंशाचे चार फुटबॉलपटू वेगवेगळ्या संघांत निवडले गेले आहेत. न्यूझीलंडचा सरप्रीत सिंग, कतारचा तहसीन महंमद जमशीद, डीआर काँगो संघातील सॅम्युएल मुतुसामी, ऑस्ट्रेलियाचा निशान वेलूपिल्ले या साऱ्यांची पाळेमुळे भारतीय आहेत.

भारताच्या सीनिअर पुरुष फुटबॉल संघाला विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरणे खूपच अवघड असून, आपला खंडप्राय देश जागतिक पातळीवरील या प्रतिष्ठेच्या मैदानावर कधी खेळेल याची शाश्‍वती नाही. अमेरिका-मेक्सिको-कॅनडात होणाऱ्या यावेळच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत काही भारतीय वंशाचे खेळाडू कौशल्य प्रदर्शित करताना दिसतील, भारतीयांसाठी हाच तेवढा दिलासा आहे. २००६मध्ये जर्मनीत झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत भारतीय वंशाचा मध्यरक्षक विकास धोरासू  फ्रान्स संघातून खेळला होता. विकासची वंशवेल मूळची आंध्र प्रदेशमधील विझियानगरम येथील आहे.

Loading content, please wait...

Related Stories

T20 World Cup 2007 India prize money
India Dropped 13 Catches in Asia Cup
Spain vs Argentina FIFA World Cup 2026 Final
Hockey World Cup
Marathi News Esakal
www.esakal.com