
जेव्हा जेव्हा सर्वत्र निराशा असते, तेव्हा तेव्हा धीराने केलेली खरेदी छान फळ देते. आज सारी निफ्टीच घ्यावीशी वाटत असली, तरी टेलिकॉम क्षेत्र, ग्राहक क्षेत्र आकर्षक आहेत. नेहमीच्या शेअर बाजाराच्या गुंतवणूकदाराला स्वतःच्या आवडीचे शेअर घेता येतील.
गेल्या वर्षभरात प्रथमच असे झाले, की आपली स्थानिक सिपची कुमक कामी आली नाही. विक्रीच्या रेट्याखाली तेजीची स्वप्ने धुळीला मिळाली. म्युच्युअल फंडांकडे भरपूर रोकड आहे, पण त्यांनीही ती पुरवून पुरवून वापरायचे ठरवले आहे असे दिसते.
परदेशी पाहुणे सतत विक्री करताहेत, स्थानिक संस्थांनीही हात आखडता घेतलेला, मग बाजाराचे पानिपत व्हायला कितीसा वेळ लागणार?