

Indian Stock Market
esakal
अमेरिकेशी करार पटकन न होणे, ही इष्टापत्तीच समजली पाहिजे, कारण आता सरकारला भांडवली खर्च वाढवावे लागतील. तसे झाल्यास अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळेल. त्यातून महसुली तूट वाढेल. अंदाजपत्रकात ही तूट कमी करण्याचे जे आश्वासन सरकारने स्वतःला दिले होते, ते पाळले जाणार नाही. गेल्या सप्ताहात (ता. १२ ते १६ जानेवारी) निफ्टी कशीबशी ११ अंशांनी वधारून २५६९४ अंशांवर बंद झाली. एकेक बुरुज ढासळत चालला आहे. तात्यांकडून रोजच नवनवे स्फुटनिक येत असल्यामुळे, बातम्यांच्या तालावर शेअर बाजाराचा ईसीजी वरखाली होत आहे. मंदीवाले हळूहळू फास आवळत चालले आहेत आणि निफ्टीची आधारपातळी तुटत चालली आहे.