

Indian Sweets Culture
esakal
थंड हवामानात शरीराला उष्णता देणारा आणि पौष्टिक असा हलवा आज संपूर्ण भारतात आणि जगभर लोकप्रिय झाला आहे. शाही तुकडा, फालुदा, रबडी-जिलेबी, फिरणी या मिठायांवर लखनौच्या नवाबी संस्कृतीचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. तर अयोध्येची मिठाई ही मंदिर, पूजा, नैवेद्य आणि सणांच्या परंपरेशी जोडली जाते.
मिठाई ही भारतीय जीवनपद्धतीची गोड ओळख! भारतीय खाद्यसंस्कृतीत मिठाईने विशेष स्थान मिळवले आहे. आनंद, शुभेच्छा आणि सणवारांचे प्रतीक असलेल्या मिठाईशिवाय आपल्याकडील कोणताच सण व उत्सव पूर्ण होणे अशक्य! लग्न, वाढदिवस, समारंभ किंवा आनंदाचा प्रसंग असो, त्याची सुरुवात मिठाईने तोंड गोड करूनच केली जाते. भारतातील मिठायांचा उगम प्राचीन काळातील दूध आणि धान्यांचा वापर असलेल्या साध्या पदार्थांपासून झाला. कालांतराने, धार्मिक प्रथा आणि इतर सांस्कृतिक प्रभावांमुळे त्यात विविधता आली. आज भारतीय मिठाईने जगभरात आपल्या समृद्ध चवीने एक खास ओळख मिळवली आहे.