

India Gym Equipment Market CAGR
esakal
कोविडच्या महासाथीनंतर जगभरात आरोग्याविषयी जागरूकता वाढली असून, व्यायाम आणि आहाराकडे लोकांनी लक्ष देण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. भारतातही व्यायामाप्रति जागरूकता वाढल्याचे दिसत आहे. यानंतरच्या काळात व्यायामशाळांची अर्थात जिम्सची संख्या वाढल्याचे तसेच घरात व्यायाम करण्यासाठी उपयुक्त साधनांची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. यामुळे देशातील जिम्समधील साधनांची, उपकरणांची बाजारपेठ झपाट्याने वाढत असून, तिचे आरोग्यही चांगलेच ‘तंदुरुस्त’ होणार असल्याचे संकेत आहेत.