Premium|ISRO: २०३५ पर्यंत अवकाशात ‘भारतीय अंतराळ स्थानक’ (BAS-1) निर्माण होणार..?

Space Station: इस्रोच्या गगनयान मोहिमेने भारतीय अंतराळ संशोधनात नवा अध्याय
Contribution of Dr. Vikram Sarabhai and Dr. Homi Bhabha to Indian space research

Contribution of Dr. Vikram Sarabhai and Dr. Homi Bhabha to Indian space research

Esakal

Updated on

सम्राट कदम

सोव्हिएत रशियाच्या मदतीने १९७५मध्ये आकाशात झेपावलेल्या ‘आर्यभट्ट’ उपग्रहाने भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) प्रवासाला प्रारंभ झाला. आज हा प्रवास अवकाशस्थानकापर्यंत येऊन पोहोचला आहे. येऊ घातलेल्या ‘गगनयान’ मोहिमेद्वारे इस्रोचे सीमोल्लंघन निश्चित आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात गांधीपर्व सुरू होत असतानाच, कोलकात्याच्या रस्त्यांवर शास्त्रज्ञ एस. के. मित्रा रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने भारताच्या अवकाशपर्वाची मुहूर्तमेढ रोवत होते. पृथ्वीभोवती असलेल्या आयनांबरसंबंधीचा त्यांचा प्रयोग हा भारताच्या भावी अवकाश मोहिमांची पूर्वपीठिका ठरला. नोबेल विजेते शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण आणि मेघनाद सहा यांच्या संशोधनांनी भारताच्या अवकाश संशोधनाची दिशा निश्चित केली. स्वातंत्र्यानंतर डॉ. होमी भाभा आणि डॉ. विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांतून प्रत्यक्ष अवकाश मोहिमांना मूर्त स्वरूप मिळाले.

खगोलशास्त्राची शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या भारतात अवकाश तंत्रज्ञानाची सुरुवात मात्र गेल्या काही दशकांत झाली आहे. आधुनिक अवकाश संशोधनाचा इतिहास फार तर शंभर वर्षे मागे जातो; तर प्रत्यक्ष तंत्रज्ञाननिर्मितीची कहाणी अवघ्या पन्नास वर्षांची आहे. भारताच्या अवकाशातील खऱ्या अर्थाने सीमोल्लंघनाचे शिवधनुष्य उचलले ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेने अर्थात इस्रोने! स्वातंत्र्यानंतर अवघ्या काही वर्षांत, १९६२मध्ये अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com