नातवाने घालवली सिंगापूरची भीती, केबल कार, मोनो कार आणि मादांम तुसाँचा अविस्मरणीय अनुभव

क्रूझवरील प्रवास तर आमच्यासाठी अगदीच नवीन होता. आम्ही रात्री आठ वाजता चेक इन करून त्या भल्या मोठ्या जहाजावर...
singapore trip
singapore tripsakal
Summary

क्रूझवरील प्रवास तर आमच्यासाठी अगदीच नवीन होता. आम्ही रात्री आठ वाजता चेक इन करून त्या भल्या मोठ्या जहाजावर...

-जयश्री पद्माकर जोशी

क्रूझवरील प्रवास तर आमच्यासाठी अगदीच नवीन होता. आम्ही रात्री आठ वाजता चेक इन करून त्या भल्या मोठ्या जहाजावर, म्हणजे क्रूझवर चढलो. तिथे खूप गर्दी असल्यामुळे थोडी चुकामूक झाली. पण गळ्यातल्या बिल्ल्यामुळे सावरलो. आम्ही घाबरलो होतो, पण आमच्या नातवाच्या ‘आजी-आजोबा, मी आहे. तुम्ही घाबरू नका,’ या एका वाक्याने आम्हाला खूप धीर मिळाला.

आमचा सिंगापूरला जाण्याचा योग अचानक आला. बऱ्याच वर्षांपासून स्वप्नात राहिलेली इच्छा पूर्ण झाली. आमचे कुटुंब व माझ्या मुलाच्या मित्राचे कुटुंब असे आम्ही सारे एप्रिल महिन्यात सिंगापूरला निघालो. मुंबईहून रात्री अकराची फ्लाइट होती. त्यामुळे चार वाजताच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलो.

singapore trip
singapore tripsakal

या ट्रिपच्या निमित्ताने पहिलाच विमानप्रवास होता, त्यामुळे विमानतळसुद्धा पहिल्यांदाच पाहत होतो. ते विमानतळ पाहून हरखून गेलो. अखेर रात्री अकरा वाजता विमानात बसलो. विमानात बसल्यावर तिथले चहा, पेयपदार्थ, जेवण चाखल्यानंतर तर अत्यानंद झाला.

आम्ही भारतीय प्रमाणवेळेप्रमाणे पहाटे साडेचार वाजता आणि तिथल्या वेळेप्रमाणे सकाळी सात वाजता पोहोचलो. सिंगापूर भारताच्या अडीच तास पुढे आहे. तिथले उच्च तंत्रज्ञान, स्वच्छता, शिस्त पाहून आपण कुठेतरी कमी पडतो असे वाटून गेले.दुसऱ्या दिवशी आम्ही आवरून हॉटेलमध्येच नाश्ता करून सकाळी अकरा वाजता बाहेर पडलो.

तिथल्या उंच उंच गगनाला भिडणाऱ्या इमारती लक्ष वेधून घेत होत्या. तिथले `ज्युरासिक पार्क’ पाहिले. ते खूपच मोठे असल्यामुळे आमचा आख्खा दिवस तिथेच गेला. तेथे खूप जॉय राईडही आहेत. त्यांचीही मजा लुटली. वॉटर राफ्टिंगही केले. मुलांना खेळायलाही भरपूर गेम होते.संपूर्ण सिंगापुरात खूप मोठी गार्डन आहेत.

तिसरा दिवस आम्ही गार्डन बघण्यासाठीच राखून ठेवला होता. आम्ही कधीही न पाहिलेल्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आणि फुले तिथल्या गार्डनमध्ये पाहिली. आम्ही नाईट सफारीसुद्धा केली. छोट्या ट्रेनमधून सिंह, हत्ती, सांबर, पांडा, गेंडा असे बरेच प्राणी पाहिले.

singapore trip
Akola : गुंठेवारी नियमानुकूलसाठी आणखी एक संधी प्रस्‍ताव ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यासाठी ३१ ऑगस्‍टपर्यंत मुदतवाढ

मादाम तुसाँ म्युझियममध्ये असंख्य मेणाचे पुतळे बघितले. तिथे महात्मा गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माधुरी दीक्षित, प्रियांका चोप्रा, काजोल आणि क्रिकेटवीर सचिन अशा आपल्या भारतातील प्रसिद्ध लोकांचेही पुतळे आहेत. त्या पुतळ्यांबरोबर फोटोही काढले.तिथल्या एका उंच इमारतीला भेट दिली. त्या इमारतीतल्या एका मॉलमध्ये उंच कुंडीत वडाची झाडे लावली होती.

singapore trip
singapore tripsakal

त्या इमारतीच्या ५७व्या मजल्यावरून सिंगापूरचे विहंगम दृश्य फारच छान दिसत होते.नंतर केबल कारमध्ये बसलो. तो क्षण तर फार सुखद होता. सुरुवातीला थोडी भीती वाटत होती. पण वर गेल्यावर खूप दाट जंगल, उंच उंच इमारती, स्वच्छ रस्ते, समुद्र हे संपूर्ण दृश्य पाहून आपण जणू स्वर्गाच्या अगदी जवळ आलो आहोत, असेच वाटत होते. तेथील मोनो कार तर फारच मनात भरली.

सिंगापूरमध्ये कुठेही जा, सरकते जिने आणि लिफ्ट आमची पाठ सोडत नव्हते. सुरुवातीला सरकत्या जिन्यावरून जाताना फार भीती वाटायची, पण माझ्या नातवाने व मुलाने मनातील भीती चालवली. आम्ही पाहिलेला नाईट लायटिंग शो तर फार सुरेख होता. ते पाहून खरेच डोळ्यांचे पारणे फिटले.

singapore trip
Solapur : सांगोल्यासाठी पुरवणी निधी अर्थसंकल्पात ३५ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर; आमदार शहाजी पाटील

क्रूझवरील प्रवास तर आमच्यासाठी अगदीच नवीन होता. आम्ही रात्री आठ वाजता चेक इन करून त्या भल्या मोठ्या जहाजावर, म्हणजे क्रूझवर चढलो. तिथे खूप गर्दी असल्यामुळे थोडी चुकामूक झाली. पण गळ्यातल्या बिल्ल्यामुळे सावरलो. तिथे आम्ही घाबरलो होतो, पण आमच्या नातवाच्या ‘आजी-आजोबा, मी आहे.तुम्ही घाबरू नका,’ या एका वाक्याने आम्हाला खूप धीर मिळाला.

खूप वेळ आपण पाण्यावर राहायचे हे आम्हाला खूपच भीतीदायक वाटले होते. आमची रूम तेराव्या मजल्यावर, मुलाची रूम बाराव्या आणि मित्राची अठराव्या मजल्यावर होती, हे कळल्यावर तर आम्ही गळालोच होतो. पण क्षणाक्षणाला आमच्या नातवाच्या त्या वाक्याची आठवण व्हायची. त्या क्रूझवर जेवण, नाश्ता फार अप्रतिम होता.

सोळाव्या मजल्यावर तर चक्क पोहण्याचा तलाव होता. तिथे आमची सून, मुलगा आणि नातवंडांनी पोहण्याचा आनंदही घेतला. त्या भल्या मोठ्या जहाजावर अडीच दिवस कसे गेले ते कळलेपण नाही. आम्ही असंख्य फोटो काढले आणि खूप एन्जॉय केले. क्रूझवरून उतरल्यावर रात्री हॉटेलमध्ये जेवण केले. सकाळी नाश्ता केला.

singapore trip
Pune News : प्राचार्यपदी मुदतवाढ मागणारी सुधाकर जाधवर यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

सिंगापूरचे विलोभनीय सौंदर्य पाहून मन फार भरून गेले. ही सिंगापूरची ट्रिप अविस्मरणीय ठरली. हे सगळे शक्य झाले कारण आमच्या कुटुंबीयांनी वेळोवेळी आम्हाला धीर दिला. त्यांच्यामुळे ही सिंगापूर ट्रिप आम्ही आयुष्यभर विसरणे शक्य नाही. खूप वेळ आपण पाण्यावर राहायचे हे आम्हाला खूपच भीतीदायक वाटले होते.

आमची रूम तेराव्या मजल्यावर, मुलाची रूम बाराव्या आणि मित्राची अठराव्या मजल्यावर होती, हे कळल्यावर तर आम्ही गळालोच होतो. पण क्षणाक्षणाला आमच्या नातवाच्या त्या वाक्याची आठवण व्हायची. त्या क्रूझवर जेवण, नाश्ता फार अप्रतिम होता. सोळाव्या मजल्यावर तर चक्क पोहण्याचा तलाव होता.

तिथे आमची सून, मुलगा आणि नातवंडांनी पोहण्याचा आनंदही घेतला. त्या भल्या मोठ्या जहाजावर अडीच दिवस कसे गेले ते कळलेपण नाही. आम्ही असंख्य फोटो काढले आणि खूप एन्जॉय केले. क्रूझवरून उतरल्यावर रात्री हॉटेलमध्ये जेवण केले. सकाळी नाश्ता केला.

सिंगापूरचे विलोभनीय सौंदर्य पाहून मन फार भरून गेले. ही सिंगापूरची ट्रिप अविस्मरणीय ठरली. हे सगळे शक्य झाले कारण आमच्या कुटुंबीयांनी वेळोवेळी आम्हाला धीर दिला. त्यांच्यामुळे ही सिंगापूर ट्रिप आम्ही आयुष्यभर विसरणे शक्य नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com