Kidney Transplant: डुकराची किडनी माणसामध्ये बसविण्याची गोष्ट.! जाणून घ्या कसा केला होता माकडावर प्रयोग

आपल्या अवतीभवती इतक्या सूक्ष्मजीवांचा विळखा पडलेला असतो, की एका वैज्ञानिकानं त्याचं वर्णन ‘आपण सूक्ष्मजीवांच्या सागरातच पोहत आहोत,’ असं केलं आहे
kidney transplant
kidney transplant Esakal

डॉ. बाळ फोंडके

जेव्हा एखाद्या इजेमुळं किंवा शस्त्रक्रियेच्यावेळी केलेल्या कापाकापीमुळं प्रमाणाबाहेर रक्तस्राव होतो, तेव्हा शरीरात बाहेरून रक्त चढवावं लागतं. रक्तदान करण्यासाठी अनेकजण पुढं येतात, पण मानवी शरीर सगळ्यांचंच रक्त स्वीकारत नाही. कारण या रक्तपेशींच्या बाहेरच्या आवरणावर त्यांचं ओळखपत्र असणारे रेणू असतात.

ते वाचल्यावर रक्त परकीय असल्याची जाणीव लिम्फपेशींना होते. ते त्या रक्ताला आपलं मानत नाहीत. ते भलेही मदतीला धावून आलेलं असलं, तरी त्याला घालवून दिल्याशिवाय यंत्रणा स्वस्थ बसत नाही. त्यामुळंचं आपल्या आधार कार्डशी मिळतं जुळतं, त्याच रक्तगटातलं रक्त असल्याशिवाय ते स्वीकारलं जात नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com