Premium|Salary hike vs savings : पगार वाढतोय, बचत वाढत नाही?

Salary Increase Financial Planning : पगार वाढल्यानंतर खर्चही नकळत वाढत जातो आणि बचत कमी होते. ‘लाइफस्टाइल इन्फ्लेशन’ ओळखून आर्थिक शिस्त कशी राखावी, याचा सविस्तर उलगडा.
Salary hike vs savings

Salary hike vs savings

esakal

Updated on

डॉ. अमेय खरे

पगारवाढ झाल्यावर जीवनमान सुधारणं आणि आर्थिक भविष्य सुरक्षित करणं, या दोन्ही गोष्टी एकत्र साधता येतात. लाइफस्टाइल इन्फ्लेशन

ही एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे, पण ती ओळखली की तिच्यावर नियंत्रण ठेवणं शक्य होतं. यासाठी फार मोठा त्याग करावा लागत नाही, फक्त उत्पन्नवाढ झाल्यावर एक क्षण थांबून विचार करण्याची सवय लावावी लागते, इतकंच.

तीन वर्षांपूर्वी प्रियाचा पगार महिन्याला तीस हजार रुपये होता, आज तो पंचेचाळीस हजार झाला आहे, म्हणजे आधीच्या पगारात पन्नास टक्के वाढ झाली. पण बचत खात्यातली शिल्लक मात्र तेवढीच आहे, किंबहुना थोडी कमीच. प्रियाला आश्चर्य वाटतं, पगार वाढलाय, मग पैसे शिल्लक का राहत नाहीत? उत्तर तिच्या स्वतःच्या खर्चातच लपलेलं आहे, हे तिच्या लक्षात येत नाही.

मागच्या काही लेखांमध्ये आपण बजेट, बचत आणि गुंतवणूक यांविषयी चर्चा केली. एक गोष्ट सतत समोर आली, ती म्हणजे उत्पन्न आणि खर्च यांचं योग्य गणित मांडणं किती महत्त्वाचं आहे. पण एक प्रश्न अनेकांना सतावतो. पगार दरवर्षी वाढतो, करिअरमध्ये प्रगती होते, तरीही बचत तेवढ्याच वेगानं वाढताना दिसत नाही. याला कारण आहे एक मानसशास्त्रीय आणि आर्थिक प्रक्रिया, जिला ‘लाइफस्टाइल इन्फ्लेशन’ म्हणतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com