सागरी शेती आणि जलचरांवर या संस्थेत होते मोठे संशोधन

संशोधनासाठी मासे संवर्धन, समुद्री खाद्य संवर्धन, पोषण-जनुकीयविज्ञान-जैवतंत्रज्ञान, जलचर आरोग्य व पर्यावरण, सामाजिक विज्ञान असे स्वतंत्र विभाग आहेत.
aquaculture sea
aquaculture seaesakal

सुधीर फाकटकर

आपल्या देशाला तब्बल साडेसात हजार किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. एवढ्या लांबलचक किनाऱ्याबरोबर, नद्या समुद्राला मिळताना निर्माण झालेल्या त्रिभूज प्रदेशांमुळे खाऱ्या पाण्यातील जलचरांच्या कोळंबी, कालव, शिंपले अशा विविध प्रकारच्या सागरी जिवांपासून खेकडे तसेच समुद्रीशैवाल अशा अनेक जाती-प्रजातींच्या सजिवांची वैविध्यपूर्ण संपदाही लाभलेली आहे.

समुद्रकिनारे आणि त्रिभूज प्रदेशातील लोकांच्या उपजिविकेचा मुख्य स्रोत असणारी आणि खाद्यान्नाबरोबरच औद्यौगिक महत्त्व असलेली ही संपदा देशाच्या आर्थिक विकासातही मोलाची भर टाकणारी आहे.

या अनुषंगाने भारतीय कृषी संशोधन परिषदेने १९८७मध्ये खाऱ्या पाण्यातील जलचरांवर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र केंद्र (Central Institute of Brackishwater Aquaculture -CIBA) चेन्नईच्या दक्षिणेला तीस किलोमीटरवर असलेल्या अडक्रार नदीच्या मुखापाशी मुट्टकडू या ठिकाणी उभारले.

हे केंद्र उभारल्यानंतर पुढच्याच वर्षी प. बंगाममध्ये काकद्वीप या हुगळी नदीच्या त्रिभुज प्रदेशात आधीपासून असणारे याच विषय-क्षेत्रातील संशोधन केंद्र चेन्नईच्या केंद्राशी जोडले.

aquaculture sea
Sea Water Pollution : दूषित पाण्यामुळे समुद्र काळवंडला

खाऱ्या पाण्यातील जलचरांचा शोध घेत वर्गीकरण करण्यापासून त्यावर पायाभूत संशोधन करणे; त्यातून नवतंत्रज्ञान निर्माण करणे तसेच त्यातून आर्थिक विकास साध्य करणे; या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ निर्माण करणे असे उद्देश समोर ठेवत या केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.

संशोधनासाठी मासे संवर्धन, समुद्री खाद्य संवर्धन, पोषण-जनुकीयविज्ञान-जैवतंत्रज्ञान, जलचर आरोग्य व पर्यावरण, सामाजिक विज्ञान असे स्वतंत्र विभाग आहेत.

यातील सामाजिक विज्ञान विभाग वगळता प्रत्येक विभागाची अद्ययावत प्रयोगशाळा असून केंद्रात मध्यवर्ती उपकरण सुविधा उपलब्ध आहे. याचबरोबरीने जलचरांच्या प्रायोगिक प्रजननासाठी खास उबवणीसदृश केंद्रही आहे.

सर्व विभागांना साहाय्य करण्यासाठी अभियांत्रिकी विभाग आहे. केंद्रातील ग्रंथालयात सुमारे तीन हजार संदर्भ ग्रंथ, दहा हजारांपेक्षा जास्त नियतकालिके आणि अहवाल उपलब्ध आहेत.

देशभरातील समुद्रीशास्त्राशी संबंधित विविध विषयातील संशोधन संस्थांशी या संस्थेने साहचर्य प्रस्थापित केले आहे.

aquaculture sea
Sea Facts : जगभरात समुद्राचं अस्तित्व एका दिवसासाठी नष्ट झालं तर काय होईल?

या केंद्राने आजपर्यंत सुधारीत प्रकारची समुद्री शैवालाची शेती, जलचरांसाठी स्वयंचलीत पद्धतीने खाद्य पुरवणारी यंत्रणा, उत्तम प्रकारचे जलचरांचे बीज, खाऱ्या पाण्याची गुणवैशिष्ट्ये तपासणी संच तसेच जलचरांचे आरोग्य तपासणी संच असे विविध प्रकारचे संशोधन साध्य केले आहे.

स्थापनेपासून आजपर्यंत सुमारे साठ प्रकारचे नावीन्यपूर्ण संशोधन केलेल्या या संस्थेकडे तंत्रज्ञानविषयक दोन स्वामित्व हक्कही आहेत.

या मुख्य केंद्राखेरीज अलीकडच्या दशकात मुट्टकडूपासून दक्षिणेला ३० किलोमीटरवर असणाऱ्या कोवलम या ठिकाणी आणि गुजरातमध्ये नवासरी येथेही खाऱ्या पाण्यातील जलचरांसंदर्भात संशोधन उपकेंद्रे उभारण्यात आली आहेत.

या केंद्राचे संशोधन अहवाल चाळल्यानंतर खाऱ्या पाण्यातील सजिवांची व्याप्ती आणि त्याचे अर्थकारण लक्षात येते.

या क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी तीन दिवसांपासून ते आठवड्यात पूर्ण करता येतील अशा पंधरा प्रकारच्या प्रशिक्षणांची सुविधा येथे उपलब्ध आहे.

या संशोधन केंद्रांमध्ये रोजगार आणि कार्यक्षेत्राच्याही अनेक संधी उपलब्ध असतात. तर संशोधनासंदर्भात जीवविज्ञानाशी संबंधित विविध विज्ञानशाखांच्या एम.एस्सी. विद्यार्थ्यांसाठी येथे पीएच.डी. तसेच पुढील संशोधनाची सुविधा उपलब्ध असते.

खारेपाणी जलचर संशोधन केंद्र

संथम हाय मार्ग, आर.ए. पुरम, एम.आर.सी.नगर

चेन्नई, तमिळनाडू, 600028

संकेतस्थळः https://ciba.icar.gov.in

--------------------------

aquaculture sea
Sea Life : खुल्या सागरातील जीवसृष्टी वाचविण्यासाठी करार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com