

Savory Indian Snacks
esakal
साहित्य
दोन मोठ्या वाट्या मैदा, पाव वाटी पिठीसाखर, पाव वाटी तूप, १ चमचा चिली फ्लेक्स,
१ चमचा काळे मीठ, चवीनुसार साधे मीठ, पाव चमचा सोडा, १ चमचा जाडसर मिरपूड,
२ मोठ्या टोमॅटोंची पेस्ट, तळण्यासाठी तेल, १ चमचा आमचूर पावडर, चाट मसाला.
कृती
सर्वप्रथम मैदा चाळून त्यात तुपाचे मोहन, चिली फ्लेक्स, टोमॅटोची पेस्ट घालावी. त्यानंतर त्यात सोडा आणि मिरपूड घालून चवीनुसार काळे मीठ, साधे मीठ घालावे. आता हे पीठ घट्ट मळून घ्यावे. त्यानंतर जाडसर पोळी लाटून लांब पट्ट्या कापाव्यात. या पट्ट्या तेलात मंद आचेवर तळून घ्याव्यात. गरम असतानाच त्यावर चाट मसाला, पिठीसाखर, आमचूर पावडर भुरभुरावी. खट्टेमिठ्ठे टोमॅटो कुरकुरे खाण्यासाठी तयार.