Marathon: प्रॅक्टिस केली आणि त्या मॅरेथॉनमध्ये १० किलोमीटर धावलो..

marathon
marathon esakal

मी व्यायामातून एकदाही सुट्टी घेतली नाही. सरांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचं व्यवस्थित पालन केलं. आपलं शरीर आपल्याला सर्व प्रकारचे सिग्नल देत असते. त्यावर लक्ष ठेवायचं आणि शरीराचं ऐकायचं हे पथ्यही नेहमीच पाळलं

वर्षा आठवले

नुकतीच म्हणजे २४ सप्टेंबरला पुण्यातल्या सिंहगड रोडवरच्या पीआरसाऊथ या ग्रुपची 'लास्ट संडे ऑफ द मंथ' ही रन पार पडली. तेव्हा ग्रुपमधल्या बऱ्याच जणांशी बोलणं झालं. त्यातले दोघं-तिघं अगदी नव्याने म्हणजे साधारण वर्षभरापूर्वी त्या ग्रुपला जॉईन झाले होते. त्यातलेच एकजण म्हणजे दुर्गेश बुगडे.

मागच्या वर्षीच्या बजाज आलियांझ या हाफ मॅरेथॉनसाठी त्यांनी पीआरसाऊथ या ग्रुपसोबत धावण्याची प्रॅक्टिस सुरू केली होती. मॅरेथॉनमध्ये धावायचं तर काय तयारी केली, मॅरेथॉनमध्ये धावायचं हे कसं ठरवलं असं सहजच त्यांना विचारलं, तेव्हा दुर्गेश म्हणाले, “एकदा सकाळमध्ये या मॅरेथॉनविषयी वाचलं. तेव्हाच सकाळमधील हेल्थवेल्थ सदरात आरोग्यविषयक लेख वाचत होतो. त्यात वजन कमी करणे, उत्तम आरोग्य राखणे याविषयी जशी माहिती होती तशीच धावण्याविषयीही होती. तीही वाचत होतोच.

तेव्हाच वाटलं की आपणही धावू शकतो. बघू तरी प्रयत्न करून. मॅरेथॉनमध्ये धावायचं तर पु.ल.देशपांडे गार्डनमध्ये ट्रेनिंग घेतलं जातं हेही वाचलं.” दुर्गेश यांनी लगेचच पु.ल.देशपांडे गार्डनमध्ये जाऊन ट्रेनिंग कोण घेतं वगैरे चौकशी करायची ठरवली.

marathon
Marathon News : सातारा हिल मॅरेथॉनमध्ये दरवर्षी बारामतीकरांचा वाढतोय सहभाग...

दुर्गेश सांगतात, “सुरुवातीला बरेच दिवस पहाटे पाच वाजताच बागेपाशी जायचो. पण कळायचं नाही कुठे प्रॅक्टिस चालते. नंतर एक दिवस पद्मराज दोशी सरांशी भेट झाली. तोपर्यंत मॅरेथॉनला जेमतेम महिनाच राहिला असेल. तरीही प्रॅक्टिस सुरू केली. आणि त्या मॅरेथॉनमध्ये १० किलोमीटर पूर्ण केले.

सर सांगतील तसं आठवड्यातले तीन दिवस रन आणि दोन दिवस एसटी म्हणजेच स्ट्रेंथ ट्रेनिंग असं रनर्ससाठी घेतलं जातं. मला कळलं तेव्हा माझ्या पहिल्या मॅरेथॉनसाठी आता फारसा वेळ उरला नव्हता. पण तरीही जमतील तसे पुढचे दिवस या पद्धतीने प्रॅक्टिस केली. आणि मॅरेथॉन पूर्ण केली.”

साधारणपणे नोव्हेंबरपासून मॅरेथॉनचा सीझन सुरू होतो. अंतर असतं ते अगदी ५ किलोमीटरपासून ते फुल मॅरेथॉन म्हणजे ४२ किलोमीटरचं. आपल्याकडे मॅरेथॉनला एक आगळंवेगळं ग्लॅमर असल्यामुळे आता प्रत्येकालाच कधीनाकधी आपणही मॅरेथॉनमध्ये भाग घ्यावा असं वाटत असतं.

त्यासाठी तयारी कशी करायची, कधीपासून करायची, अशी तयारी कोण करून घेतं, त्यासाठी फी असते का, असेल तर किती असे एक ना अनेक प्रश्न मनात येत राहतात. काहीवेळा तर काहीजण कुठलीही तयारी न करताही थेट एखाद्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतात. त्यामुळे होणारे काही शारीरिक त्रासही मग सहन करावे लागतात.

marathon
Mumbai Marathon : डोक्यावर तुऱ्याचा फेटा, नऊवारी साडी अन् पायात शूज

गेल्या वर्षभरापासून धावण्याचा सराव करणारे सचिन धुमाळ हेच सांगत होते. सचिन यांनी २०१९मध्ये त्यांची पहिली मॅरेथॉन केली ती १० किलोमीटरची. ते सांगत होते, “मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. पण काहीच प्रॅक्टिस करत नव्हतो.

थेट १० किलोमीटर धावायलाच गेलो. ती धाव ६८ मिनिटांत पूर्णही केली. मग तो पूर्ण दिवस अगदी झोपून काढला. नंतरही आठवडाभर लंगडत चालत होतो. नंतर पुन्हा मॅरेथॉन काय रनिंगचंच नावही काढलं नाही.” अशीच दोन वर्षे गेली. आणि सचिन यांनी पुन्हा एकदा वर्तमानपत्रामध्ये मॅरेथॉनची बातमी वाचली.

यावेळी मात्र व्यवस्थित प्रॅक्टीस करूनच भाग घ्यायचा असा निश्चय केला. त्याच वर्तमानपत्रात फ्री ट्रेनिंग मिळणार अशीही माहिती होती. मग त्यांनी मार्गदर्शन घ्यायचं ठरवलं. पद्मराज दोशी सर आणि भावेश शहा यांच्या मार्गदर्शनाखाली रीतसर सराव सुरू झाला. सचिन यांनी २०२२ची १० किलोमीटरची मॅरेथॉन ६४ मिनिटांत पूर्ण केली. विशेष म्हणजे त्यानंतर त्यांनी १० किलोमीटरच्या पाच मॅरेथॉन पूर्ण केल्या त्याही कोणत्याही प्रकारची इंज्युरी होऊ न देता.

सचिन यांनी त्यानंतर तीन महिन्यांनी पुणे इंटरनॅशनल हाफ मॅरेथॉन पूर्ण केली. आणि १० महिन्यांनंतर एएफएमसीची फुल मॅरेथॉनही पूर्ण केली. हे सर्व करू शकलो कारण या सर्व काळात मी व्यायामातून एकदाही सुट्टी घेतली नाही. सरांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचं व्यवस्थित पालन केलं. आपलं शरीर आपल्याला सर्व प्रकारचे सिग्नल देत असते. त्यावर लक्ष ठेवायचं आणि शरीराचं ऐकायचं हे पथ्यही नेहमीच पाळलं, असं सचिन सांगतात.

कुठल्याही मॅरेथॉनमध्ये धावायचं तर योग्य आहार, व्यायाम आणि पूर्ण झोप ही त्रिसूत्री आचरणात आणली तर धावणं हे आपल्याला रोजच्या आयुष्याचा एक भाग होईल हे नक्की.

marathon
Morning Walk Mistakes मॉर्निंग वॉकपूर्वी करू नका या 5 चुका, अन्यथा वाढतील शारीरिक समस्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com