

Marilyn Monroe
esakal
अरविंद रेणापूरकर
मर्लिन मन्रोच्या जन्माला २०२६मध्ये शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. मृत्यूला सहा दशकांहून अधिक काळ लोटला, तरी तिची प्रतिमा आजही फॅशन, चित्रपट, जाहिराती, पॉप आर्ट संस्कृतीत जिवंत आहे. १ जून १९२६ रोजी जन्मलेली नॉर्मा जीन मॉर्टेन्सन पुढे जगभर ‘मर्लिन मन्रो’ म्हणून ओळखली गेली. अवघ्या ३६ वर्षांच्या आयुष्यात तिने निर्माण केलेली प्रतिमा इतकी प्रभावी ठरली, की तिच्या मृत्यूनंतरही ती सतत नव्याने जन्म घेत राहिली.
मर्लिन मन्रोच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘व्हेरो मोडा’नावाच्या कंपनीने मुंबईत एक सप्टेंबर २०२६ला विशेष कॅप्सूल कलेक्शन सादर केले. यात मर्लिनची छायाचित्रे, स्वाक्षरी आणि प्रसिद्ध ‘किस मार्क’ यांचा वापर करण्यात आला आहे. ड्रेसेस, ग्राफिक टी-शर्ट्स, स्वेटशर्ट्स, डेनिम्स आणि कॅप्समधून तिच्या जुन्या शैलीला आधुनिक रूप देण्यात आले आहे. पोल्का डॉट्स, मोत्यांची सजावट आणि चमकदार ऱ्हाइनस्टोन्समुळे या संग्रहात मर्लिनच्या काळातील ग्लॅमरची झलक दिसते. काळ बदलला, फॅशन बदलली; मात्र मर्लिनची प्रतिमा आजही नव्या पिढीला आकर्षित करते.