

Biryani tips and tricks
esakal
एखाद्या घरगुती कार्यक्रमाला हॉटेलसारख्या चवीची बिर्याणी करायची असेल, तर काही टिप्स आणि महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. यासाठी मुख्यत: लागते ती थोडीशी पूर्वतयारी आणि रांधण्याची मनापासून इच्छा! बिर्याणी करण्यापूर्वी, करताना आणि केल्यानंतर या टिप्स तुम्हाला नक्की मदत करतील.
व्हेज बिर्याणी, मटण दम बिर्याणी, चिकन दम बिर्याणी, चिकन तंदुरी दम बिर्याणी, अंडा बिर्याणी, प्रॉन्स बिर्याणी, फिश बिर्याणी असे बिर्याणीचे प्रकार सहसा घरी केले जातात. यात त्या त्या भागात पिकणाऱ्या आणि मिळणाऱ्या जिनसांच्या उपलब्धतेनुसार बदलही होतात. हैदराबादी, अवधी, बॉम्बे, गोवन, मलबार, कलकत्ता स्टाइल असे प्रकारही लोकप्रिय आहेत. बिर्याणी कोणतीही असो, पूर्वतयारी व्यवस्थित असेल, तर चविष्ट मसालेदार बिर्याणी करणं फारसं अवघड नसतं. त्यासाठीच्या काही टिप्स आणि ट्रिक्स...