योगिराज प्रभुणे
आरोग्य क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय पर्यटन ही संकल्पना गेल्या दशकापासून मूळ धरू लागली आहे. जगातील विकसित देशांच्या बरोबरच भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये जाऊन उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसते.
यात देशात महाराष्ट्र आघाडीवर आहे. पुणे-मुंबईसह इतर शहरांमधील रुग्णालये एनएबीएच, जेसीआय अशी रुग्णसेवेची गुणवत्ता अधोरेखित करणाऱ्या संस्थांची मान्यता घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी साधलेला संवाद...