Premium|Monaco Grand Prix : मोनॅकोच्या वैभवशाली कसिनो स्क्वेअरपासून फॉर्म्युला एकच्या थरारक ट्रॅकपर्यंतची सफर

Monte Carlo Casino : मोनॅकोच्या वैभवाचे प्रतीक असलेले कसिनो स्क्वेअर, माँटे कार्लो कसिनो आणि मोनॅको ग्रांप्रीचा थरार अनुभवताना आलिशान वास्तू, अरुंद रस्ते आणि फॉर्म्युला एकच्या अनोख्या रेस ट्रॅकची सफर घडते.
Monaco Grand Prix

Monaco Grand Prix

esakal

Updated on: 

मृणाल तुळपुळे

फॉर्म्युला १ सर्किटवरील अत्यंत महत्त्वाचे व मोनॅकोचे वैभव दर्शवणारे वळण म्हणजे कसिनो स्क्वेअर. या ठिकाणी आल्यानंतर आमचे डोळे अक्षरशः दिपले. हे आलिशान वळण जगप्रसिद्ध माँटे कार्लो कसिनो, हॉटेल दे पॅरिस आणि कॅफे दे पॅरिस यांच्या जवळून जाते. हे वळण मोनॅकोच्या ऐश्‍वर्याचे प्रतीक आहे.

प्रिन्सिपॅलिटी ऑफ मोनॅको या देशाबद्दल आणि माँटे कार्लो कसिनोबद्दल खूप काही ऐकले होते, त्यामुळे तिथे जायची फार उत्सुकता होती. मोनॅको हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लहान देश असून, तो जगातील अतिशय श्रीमंत देश म्हणून ओळखला जातो. या देशाचे विशेष म्हणजे तेथील रहिवाशांना वैयक्तिक प्राप्तिकर भरावा लागत नाही व या कारणामुळे जगभरातील अनेक धनाढ्य लोक, उद्योगपती व खेळाडू तिथे स्थायिक झाले आहेत. ही सगळी माहिती जाणून घेतल्‍यानंतर मोनॅकोला जाण्याचे निश्‍चित केले.

मोनॅको म्हटले की सर्वप्रथम आठवते ती मोनॅको ग्रांप्री ही जगातील सर्वात प्रतिष्ठेची कार रेस. या रेससाठी कायमस्वरूपी रेस ट्रॅकवर न भरता, ती माँटे कार्लो आणि मोनॅकोच्या सार्वजनिक रस्त्यांवर भरवली जाते. मग या वळणावळणांच्या रस्त्याचा रेस ट्रॅक अनुभवण्यासाठी आम्ही निघालो. वर्षातील बहुतांश काळ या रस्त्यांवर नेहमीसारखी वाहतूक सुरू असते. पण फॉर्म्युला १ शर्यतीच्या दिवसांत रस्त्यावर केलेले विशेष मार्किंग, स्टार्ट व फिनिश लाइन आणि वळणांची चिन्हांकने यांमुळे त्या रस्त्याचे जगप्रसिद्ध रेस ट्रॅकमध्ये रूपांतर होते. फॉर्म्युला १मधील हा सर्वात लहान आणि सर्वात अरुंद ट्रॅक मानला जातो. या ट्रॅकचे वैशिष्ट्य म्हणजे ट्रॅकचा काही भाग डोंगराखालील बोगद्यातूनदेखील जातो. त्यामुळे मोनॅको ग्रांप्रीमध्ये वेगापेक्षा चालकाच्या कौशल्याची खरी परीक्षा असते. ही शर्यत बघायला मिळणे हे जगातील प्रत्येक मोटरस्पोर्टप्रेमीचे स्वप्न असते व दरवर्षी लाखो प्रेक्षक ही स्पर्धा पाहण्यासाठी येथे येतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com