Himalaya : हिमालयाच्या जन्मकथेचे नव्याने आकलन

जागतिक पर्वत दिन विशेष : जेव्हा इथे सागरी जीवनाची भरभराट झाली होती तो हा काळ. हिमालयाची सगळी जन्मकथाच त्यामुळे पुन्हा तपासून पाहावी लागणार आहे.
Himalaya
HimalayaSakal

भारतीय प्लेटची युरेशियन भूतबकाशी टक्कर झाल्यामुळे हिमालय निर्माण झाला, असे मानले जाते. प्रवाळ खडकांच्या जीवाश्मांचा शोध या प्रदेशाचा पूर्णपणे वेगळा असा भूतकाळ सूचित करतो; जेव्हा इथे सागरी जीवनाची भरभराट झाली होती तो हा काळ. हिमालयाची सगळी जन्मकथाच त्यामुळे पुन्हा तपासून पाहावी लागणार आहे. सोमवारी (ता. ११ डिसेंबर) असलेल्या जागतिक पर्वत दिनानिमित्त...

प्रख्यात भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. रितेश आर्य यांनी पूर्व लडाख हिमालयात बुर्तसे/ बुर्त्से येथे समुद्रसपाटीपासून सहा हजार मीटर उंचीवर प्रवाळ खडकांचे (Coral Reef) जीवाश्म (Fossils) दोनच महिन्यांपूर्वी (१८ ऑक्टोबर २०२३) शोधून काढले आहेत. भूजल संशोधन करत असताना त्यांनी हा महत्त्वपूर्ण शोध लावला.

नेहमी उष्णकटिबंधीय, उथळ पाण्याशी सबंधित असणारे प्रवाळ खडक, लडाखच्या खाबडखोबड (Rugged) आणि उच्च-उंचीच्या हिमालयीन प्रदेशात आढळणे हे अगदीच अनपेक्षित आहे. बुर्त्से येथील प्रवाळ खडकांच्या जीवाश्मांचा हा शोध हिमालय निर्मितीच्या सगळ्या संकल्पनांना छेद देणारा आणि हिमालयाच्या भूशास्त्रीय इतिहासाचे पुनरावलोकन करण्यास भाग पाडणारा आहे, असे आर्य यांचे मत आहे.

रितेश आर्य यांच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांना सापडलेल्या जीवाश्मांत प्रवाळ वसाहतींच्या गुंतागुंतीच्या रचनांचा समावेश असल्याचे दिसून येते. या रचनांमुळे प्राचीन काळांत बुर्त्सेपर्यंत पसरलेल्या (३५ अंश उत्तर / ७८ अंश पूर्व) टेथिस समुद्राच्या पाण्याखाली कसे जीवन असावे त्याची ओझरती कल्पना आपल्याला येऊ शकते.

प्राचीन काळात या भागांतील समुद्र तळावर असलेल्या अविश्वसनीय अशा जैवविविधतेचा हे जीवाश्म ज्वलंत पुरावाच आहेत. हा शोध म्हणजे केवळ भूवैज्ञानिक आश्चर्य नाही, तर पृथ्वीच्या आणि विशेषतः हिमालयाच्या भूतकाळात डोकावण्याची संधी त्यामुळे मिळते. समुद्रसपाटीपासून ६,००० मीटर उंचीवर या जीवाश्मांचे असणे हिमालयाच्या भूवैज्ञानिक इतिहासाच्या सर्वप्रस्थापित पूर्वकल्पनांना आव्हान देणारे आहे.

एकेकाळी भारतीय प्लेटची युरेशियन भूतबकाशी टक्कर झाल्यामुळे हिमालय निर्माण झाला, असे मानले जाते. प्रवाळ खडकांच्या जीवाश्मांचा शोध या प्रदेशासाठी पूर्णपणे वेगळा असा भूतकाळ सूचित करतो. इथे सागरी जीवनाची भरभराट झाली होती तो हा काळ.

हिमालयाची सगळी जन्मकथाच त्यामुळे पुन्हा तपासून पाहावी लागणार आहे. हिमालयातल्या सगळ्यात उंच आणि आतल्या भागाला ‘टेथिस हिमालय’ असे म्हटले जाते. निर्मितीच्यावेळी इथल्या गाळात लक्षावधी समुद्री जीव आणि वनस्पती गाडल्या गेल्या होत्या.

मात्र टेथिस समुद्रात प्रवाळ निर्मितीसाठी आवश्यक असलेली विशिष्ट क्षारता, गाळसंचयन यासारख्या उथळ सागरी पर्यावरणाचे अस्तित्व दाखवणारा एकही पुरावा आजपर्यंत शास्त्रज्ञांच्या हाती लागला नव्हता. पूर्वी लडाख आणि हिमाचल प्रदेशात टेथिस महासागर होता.

शिवालिक पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेली घाघरा नदी आणि काराकोरम पर्वतरांगेतील सिंधू नदी या दरम्यानचा संपूर्णप्रदेश टेथिस समुद्र खळग्याचाच भाग होता. ऑयस्टर फोरामिनिफेरा, मोलस्क, मासे इत्यादी विविध सागरी जीवाश्मांच्या इथे सापडणाऱ्या तुकड्यांतून हे स्पष्ट झाले आहे.

भारतीय भूतबकाच्या (Tectonic Plate) उत्तरेकडील भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अरवली पर्वतरांगांपासून ते तिबेटी भूतबकापर्यंतचा संपूर्णप्रदेश, टेथिस समुद्राने विभक्त केला होता. भूतबक हालचालींमुळे भारतीय भूतबक उत्तरेकडे सरकले आणि त्यामुळे टेथिस समुद्राचे आकुंचन होऊन तेथील गाळाला घड्या पडून हिमालयाचा जन्म झाला.

इंडो-ऑस्ट्रेलियन आणि युरेशियन भूतबके २५ कोटी वर्षांपूर्वी एकमेकांवर आपटून पुढे सरकत होती. त्यावेळच्या टेथिसचे उरले सुरले पाणी भारत आणि युरेशिया उपखंडांच्या दोन्ही बाजूंच्या जलाशयांत रिते झाले.

Himalaya
Hand Grip :हातातील ताकदीचा तुमच्या आरोग्याशी संबंध?

या निष्कर्षांमुळे ५.६ ते ३.४ कोटी वर्षांपूर्वीच्या इओसीन युगात डोकावण्याची संधी प्राप्त झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ३.४ कोटी वर्षांपूर्वीपर्यंत भारत आणि तिबेटची टक्करही झाली नसावी आणि टेथिस समुद्र बुर्त्सेपर्यंत पसरला असावा, असे या संशोधनातून दिसून आले आहे.

इथे सापडलेल्या फोरॅमिनिफेराचा मोठा आकार विषुववृत्तीय आणि उबदार हवामान परिस्थितीचे तर पाम पानांचे जीवाश्म असणे हे सागरी किनारपट्टीचे त्यावेळचे अस्तित्व दर्शविते. या निष्कर्षांमध्येहिमालयाच्या निर्मितीबद्दलची आपली समज बदलण्याची क्षमता आहे.

लडाख हे एकेकाळी आजच्यापेक्षा पूर्णपणे भिन्न भूवैज्ञानिक भूदृश्‍य (Landscape) असले पाहिजे. समृद्ध सागरी जीवन, प्रवाळ खडक आणि समुद्रकिनारे यांनी ते संपन्न असावे. डॉ. आर्य यांच्या म्हणण्याप्रमाणे बुर्त्सेचा भूगर्भशास्त्रीय इतिहास दक्षिणेकडील रामेश्वरम किंवा अंदमान आणि निकोबार बेटांच्या समुद्रकिनाऱ्यांसारखाच असावा. लेहच्या उत्तरेला १३५ किलोमीटर अंतरावर देपसांग मैदान प्रदेश आहे.

देपसांग किंवा बुर्त्से उंचवटा (Burtse Bulge) हे क्षेत्र देपसांग मैदानाच्या दक्षिणेस आहे आणि त्या मैदानांत बुर्त्सा नाल्याचे खोरे आहे. हा नाला अक्साई चीन प्रदेशात उगम पावतो आणि पश्चिमेकडे वाहत डेपसांग नाल्यात विलीन होतो. लडाखमधील बुर्त्सेचा भूभाग, काराकोरम पर्वतरांगेतील जुन्या रेशीम मार्गाजवळील (Silk Route) एक प्रसिद्ध ठिकाण असल्यामुळे या स्थानाला ऐतिहासिक महत्त्व आहे.

बुर्त्सा ४,८०० मीटर उंचीवर आहे. बुर्त्सा नाल्याचा उगम ५,३०० मीटर उंचीवर आहे आणि आजूबाजूच्या टेकड्या ५,५०० ते ५,६०० मीटर उंचीच्या आहेत. देपसांग मैदान हे भूरूपशास्त्रदृष्ट्या एक आंतरपर्वतीय मैदान असावे असे दिसून येते. याच भागात डॉ. आर्य यांना हे जीवाश्म सापडले. ऑगस्ट २०२३च्या सुरुवातीला रितेश आर्य यांनी लडाखमध्ये समुद्रसपाटीपासून ५,००० मीटर उंचीवर सागरी प्राण्यांचे चांगले जतन झालेले जीवाश्म शोधून काढले होते.

हिमालयाचा जन्म सुमारे ४ कोटी वर्षांपूर्वी टेथिस समुद्रातून बाहेर पडलेल्या सागरी गाळातून झाला असावा या संकल्पनेची त्यामुळे पुष्टी झाली होती. प्रवाळ खडक ही कॅल्शियम कार्बोनेटद्वारे एकत्र धरून ठेवलेल्या प्रवाळांच्या वसाहतींचा समावेश असलेली समुद्राच्या पाण्याखालची परिसंस्था आहे.

ह्या खडकांचे अस्तित्वनिरोगी सागरी पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पृथ्वीवरील दुर्मीळ आणि उत्कृष्ट परिसंस्थांपैकी एक असलेली ही परिसंस्था सगळ्या समुद्री प्रजातींपैकी सुमारे २५ टक्केप्रजातींसाठी अन्न आणि निवारा यांचा स्रोतही आहे.

Himalaya
Tourism News: थेट नववर्षापर्यंत पर्यटनाचा धमाका! केदारनाथ, बद्रिनाथ, अयोध्येसाठी बुकिंग

समुद्रातील प्रवाळ खडक हे केवळ भूवैज्ञानिक रूपच नाहीत तर पृथ्वीच्या हवामानाच्या रहस्यांचे भांडारदेखील आहेत. लेह लडाखचा प्रदेश कदाचित एकेकाळी संपन्न सागरी जीवनाने समृद्ध असेल. हिमालयाच्या निर्मितीच्या काळात असलेले समुद्रपृष्ठाचे तापमान आणि त्यावेळी झालेले समुद्र पातळीतील चढउतार या गोष्टींची कल्पना प्रवाळ खडकांच्या जीवाश्मांच्या अस्तित्वामुळे येऊ शकते.

या जीवाश्मांचा अभ्यास पृथ्वीवरील हवामानाच्या इतिहासात आणि आत्तापर्यंत झालेले हवामान बदल याविषयीच्या आपल्या ज्ञानात नक्कीच मोलाची भर टाकू शकेल, यात शंका नाही. डॉ. आर्य यांच्या या संशोधनाचे महत्त्व कळण्यासाठी प्रवाळ आणि प्रवाळ खडक ज्या प्रकारच्या पर्यावरणात वाढतात ते समजून घेणे गरजेचे आहे.

सध्याच्या युगातील प्रवाळ खंडीय मंच किंवा समुद्रबूड जमिनीवर (Continental Shelf) आणि खोल समुद्रातील बेटांच्या अवतीभोवती वाढताना आढळतात.

समुद्राच्या पाण्याचे १६ अंश ते ३६ अंश सेल्सिअस इतके तापमान, दर हजारी २५ ते ४० इतकी क्षारता, घट्ट व गुळगुळीत सागर तळ, पाण्याची सहज हालचाल आणि जोरदार भरती प्रवाह अशी परिस्थिती असणारे अपतट (Offshore) प्रदेश प्रवाळ वाढीसाठी आदर्शप्रदेश असतात. गाळयुक्त प्रवाह किंवा गाळाचे संचयन प्रवाळांच्या वाढीला प्रतिकूल असते.

समुद्रात २० मीटर खोलीपर्यंत सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात पोहोचू शकतो. त्यामुळे या खोलीपर्यंत प्रवाळांची चांगली वाढ होऊ शकते. जगात अनेक ठिकाणी ६० ते ७० मीटर खोलीवरही प्रवाळ आढळतात. मात्र त्यातील काही मृत असतात.

मृत प्रवाळांच्या वसाहतीतच नवीन प्रवाळ जन्म घेतात आणि त्यामुळे प्रवाळ मंचांचा विस्तारही वाढतो. प्रवाळ आणि प्रवाळ खडक हा समुद्रातील जैवविविधतेचा एक अतिशय सुंदरसा आविष्कार आहे. यात आढळणारी विविधता इतकी विलक्षण असते, की तिची तुलना फक्त सदाहरित वर्षावनातील जैववैविध्याबरोबरच होऊ शकते.

प्रवाळ जीव समुद्राच्या ज्या पर्यावरणात वाढतात त्या बाबतीत ते फारच संवेदनशील असतात. पर्यावरणात झालेला किंचितसा बदलही त्यांचे अस्तित्व संपुष्टात आणू शकतो. प्रवाळ मंच (Coral Reef ) तयार करणारे प्रवाळ (Corals) हे एकत्रितपणे चुन्याचे संचयन करून विस्तृत वसाहती करणारे सागरी जीव आहेत.

Himalaya
Mount Kailas Journey : आता भारतातून थेट होणार कैलास पर्वताचे दर्शन, चीनमध्ये जाण्याची गरजच नाही

लडाखमध्ये सापडलेल्या या प्रवाळ खडकांच्या जीवाश्मांची सांगड हिमालय निर्मितीशी घालण्यापूर्वी हिमालयाची माहीत असलेली जन्मकथा समजून घेणेही तितकेच गरजेचे आहे.

हिमालयाच्यानिर्मितीत, साडेसोळा कोटी वर्षांपूर्वी पॅन्जिआ (Pangea) या विशाल भूखंडातून (Supercontinent) सुटून उत्तरेकडे प्रवास करू लागलेले भारतीय भूतबक (Tectonic Plate) आणि युरेशियन भूतबक यांची ४.५ कोटी वर्षांपूर्वी झालेली टक्कर, दोन्ही भूतबकांच्या दरम्यान असलेल्या टेथिस या अरुंद, चिंचोळ्या आणि लांबट समुद्राचे आक्रसणे आणि त्यातील भूकवचाचे खडक व गाळ दाबला जाणे या सर्व घटनांचा समावेश होतो.

दबलेल्या गाळाची उंची वाढत जात असतानाच त्याचे उत्थापन (Uplifting) झाले आणि हिमालयाची निर्मिती झाली. ही प्रक्रिया दरवर्षी एक सेंटिमीटर या वेगाने या भागांत आजही चालू आहे. सुमारे दहा हजार मीटर जाडीचे खडक या हालचालीत भरडले गेले. एक कोटी ते दहा लाख वर्षांपूर्वी टेथिसचा पूर्ण लोप झाला असावा.

हिमालय निर्मितीच्या हालचालींमुळे हिमालयाच्या, उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्वपश्चिम दिशेत पसरलेल्या शिवालिक किंवा बाह्य हिमालय (Outer Himalaya), मुख्य किंवा मध्य हिमालय किंवा हिमाचल (Lessar Himalaya) आणि हिमाद्री म्हणजे बृहत् हिमालय (Grater Himalaya) अशा पर्वतरांगा तयार झाल्या.

हिमालयाची ही निर्मिती सुमारे ७० लाख वर्षे चालू असावी. लडाख तसेच हिमालयाचा भूशास्त्रीय इतिहास समजावून घेण्यासाठी आणि हिमालयातील जैवविविधतेवर प्रकाश टाकण्यासाठी हा शोध नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल, असे रितेश आर्य यांचे मत आहे. रितेश आर्य यांनी जे प्रवाळ शोधले आहेत ते अशा काळातील आहेत ज्या काळात भारताची तिबेटशी टक्कर झाली नव्हती.

म्हणजे हे प्रवाळ ४ कोटी वर्षांच्याही आधीचे आहेत. गोगलगायीसारखे मॉलस्क, शेलफिश आणि फोरामिनिफेरा (बहुतेक सूक्ष्मजीव, परंतु या भागात २ सेंटिमीटर आकाराचे) यांचे अपवादात्मकरित्या चांगले जतन झालेले जीवाश्म इथे आढळले.

ज्या काळात त्यांचे इथे संचयन झाले तो काळ त्यासाठी अनुकूल सागरी पर्यावरणाचा असावा. समुद्रसपाटीपासून ६ हजार मीटर उंचीवर आढळलेले प्रवाळ खडकांचे हे जीवाश्म आजपर्यंत नोंदले गेलेले त्यांच्या अस्तित्वाचे पहिले प्रमाण आहे.

अशा उंचीवर त्यांची उपस्थिती अवाढव्य अशा भू हालचालींच्या शक्तींवर प्रकाश टाकते ज्या हालचालींनी सागरी गाळाला जवळच्या किनारपट्टीच्या सागरी वातावरणातून इतक्या असाधारण उंचीवर उचलले!

Himalaya
Goa's Haveli : २००-३०० वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन जाणारे गोव्याच्या इंडो-पोर्तुगीज हवेल्यांचे विस्मयजनक जग

हिमालयाच्या या प्रदेशात गुंतागुंतीच्या ज्या वलिकरण आणि प्रस्तरभंग प्रक्रिया घडल्या त्या किती शक्तिशाली होत्या त्याची या जीवाश्म संशोधनानंतर कल्पना करता येते. या शक्तीनेच प्रवाळ असलेला सागरी भाग इतक्या उंचीवर उंचावला गेला.

जिथे आज हे जीवाश्म सापडले तो श्योक नदीच्या उत्तरेला असलेला चुनखडीयुक्त प्रदेश एक विलक्षण जीवाश्मसमृद्ध प्रदेश आहे असे दिसून येते. हे जीवाश्म आकारशास्त्रीयदृष्ट्या गॅस्ट्रोपॉड आणि फोरामिनिफेरा यांच्यासारखे आहेत, असे मिळालेल्या या जीवाश्मांच्या प्राथमिक तपासणीत लक्षात आले आहे.

हिमाचल प्रदेशातील कोटी या ठिकाणी असे जीवाश्म यापूर्वी सापडले आहेत. हे अंदाजे ५.६ ते ३.४ कोटी वर्षांपूर्वी इओसीन कालखंडातील आहेत. हे प्राचीन अवशेषदेखील त्या वेळच्या टेथिस समुद्राच्या अस्तित्वाचा स्पष्ट पुरावा देतात. भारत आणि तिबेट टेथिसच्याद्वारे एकमेकाला जोडले गेले होते हेही यातून स्पष्ट होते.

भारत आणि तिबेटच्या टकरीच्या वेळेपूर्वी जेव्हा दोघांमध्येटेथिस समुद्र होता आणि हिमालयाचा जन्म झाला होता त्यावेळच्या म्हणजे ५.६ ते ३.४ कोटी वर्षांपूर्वीच्या इओसीन काळातील पृथ्वीच्या इतिहासातील रहस्ये आणखी उलगडण्यासाठी या संशोधनाचा मोठाच उपयोग होईल.

जगभरातील विद्वान, जीवाश्मशास्त्रज्ञ आणि भूशास्त्रज्ञ या जीवाश्मांच्या पुढील अभ्यासाची आणि सखोल विश्लेषणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हिमालयातील सर्वात जुने जीवाश्म (Fossils) अडीच अब्ज वर्षे जुने आहेत, परंतु त्यावेळी हिमालयाचा जन्म झाला नव्हता.

कसौली या हिमाचल प्रदेशातील १,८३० मीटर उंचीवरील ठिकाणी दोन कोटी वर्षे जुन्या वनस्पतींचे जीवाश्म सापडले होते आणि ते २५ ते ५ कोटी वर्षांपूर्वीच्या कालखंडातील टेथिस समुद्रातील होते. मात्र हे सर्व जीवाश्म आज हिमालयात सापडत नाहीत आणि ते इंडोनेशिया, मलेशिया, अंदमान आणि निकोबार बेटे इत्यादींपुरतेच सीमित आहेत.

याचाच अर्थ असा, की दोन ते अडीच कोटी वर्षांपूर्वी जेव्हा कसौलीचा प्रदेश विषुववृत्ताच्या उत्तरेला ४ ते ११ अंश उत्तर अक्षवृत्ताजवळ होता तेव्हाच तिथे सागरी अवसादांचे (Sediments) संचयन झाले होते. तेव्हा हिमालयाचा जन्म झाला नव्हता.

डॉ. रितेश आर्य यांच्या मतांनुसार हिमालयाला त्याच्या सध्याच्या स्थितीत पोहोचण्यासाठी ८ ते १० दशलक्ष वर्षे जास्त लागली. त्यामुळे हिमालयाचा जन्म एक कोटी वर्षांपेक्षा कमी काळातीलच आहे.

Himalaya
Mount Meru : माऊंट मेरुच्या चढाईचा थरारक अनुभव...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com