

योगिराज प्रभुणे
जीवनात ही घडी अशीच राहू दे
प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचु दे
वेळ रात्र उत्तररात्रीकडे झुकतानाची. गीतकार यशवंत देवांचे शब्द आणि लतादीदींचे जादुई स्वर. एकेका शब्दाबरोबर माझं मन मलाच भूतकाळात खेचून नेऊ लागलं. हे तसंही माझं आवडीचं गाणं. कधीही, कुठेही कानावर पडलं तरी ओढून घेणारं. गाणं पुढे सरकत असताना मधली एकोणीस वर्षं झर्रकन पुसली गेली. क्षणन््क्षण डोळ्यापुढे तरळू लागले.
पाहू दे असेच तुला नित्य हासता
जाऊ दे असाच काळ शब्द झेलता