

Nashik Tree Cutting
esakal
नाशिकमधली वृक्षतोड, अर्थात तपोवन परिसरात केली जाणारी झाडांची तोडणी आता राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयामुळे थांबली आहे. राष्ट्रीय हरित लवादाने या वृक्षतोडीला २० फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा भरवला जाणार असून, या कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरातील झाडांची तोडणी करणे आवश्यक असल्याचे सरकारी पातळीवरून सांगितले जात आहे. विविध पर्यावरणवादी संघटनांनी याला तीव्र विरोध दर्शविला. त्यासंदर्भात राज्यभर आंदोलनही झाले.