Diwali faral shev
Esakal
सुजाता नेरुरकर
दिवाळीत फराळाचे पदार्थ करण्यात भारतीयांचा हातखंडा असतो. अनेकजण फराळातील काही अवघड पदार्थसुद्धा लीलया करताना दिसतात. फराळातील त्यातल्या त्यात थोडासा क्लिष्ट प्रकार म्हणजे शेव. घरच्या घरी कुरकुरीत नि चटकदार शेव तयार करण्यासाठी काही खास रेसिपीज...
साहित्य
अडीच कप बेसन, अर्धा टेबलस्पून काळे मीठ, अर्धा टीस्पून हळद, ४ ते ५ टेबलस्पून तेल, तळण्यासाठी तेल.
कृती
एका भांड्यात बेसन, काळे मीठ, हळद आणि तेल एकत्र करून घ्यावे. त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ मळावे. नंतर कढईत तेल गरम करायला ठेवावे. सोऱ्यामध्ये अगदी बारीक छिद्र असलेली चकती लावून पिठाचा गोळा भरावा आणि गरम तेलात शेव पाडावी. शेव सोनेरी रंग येईपर्यंत खमंग तळून घ्यावी. तळलेली शेव गार झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवावी.