Premium|Obstructive Sleep Apnea : रात्री मोठ्याने घोरता? गाढ झोप नव्हे, स्लीप ॲप्नियाचा गंभीर इशारा असू शकतो

Sleep Apnea Symptoms : मोठ्याने घोरणे हे नेहमीच गाढ झोपेचे लक्षण नसते; स्लीप ॲप्निया हा श्वास, हृदय आणि मेंदूवर परिणाम करणारा गंभीर झोपेचा आजार कसा ओळखावा, याची माहिती.
Obstructive Sleep Apnea

Obstructive Sleep Apnea

esakal

Updated on

डॉ. सुबोध देशमुख

स्लीप ॲप्नियाच्या रुग्णांची रात्रीची झोप वारंवार मोडत असल्याने त्यांना कधीही गाढ झोप मिळत नाही. मेंदू शरीर वाचवण्यासाठी रुग्णाला वारंवार हलक्या झोपेच्या अवस्थेत आणतो, त्यामुळे झोपेचे नैसर्गिक चक्र पूर्णपणे विस्कळीत होते. रुग्ण जरी रात्री आठ तास बेडवर घालवत असला, तरी त्याची प्रत्यक्ष गुणवत्तापूर्ण झोप केवळ तीन ते चार तासांचीच असते. यामुळे शरीराची अंतर्गत विश्रांती आणि पेशींची दुरुस्ती करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही.

रा त्री झोपेत मोठ्याने घोरणे ही एक अत्यंत सामान्य सवय मानली जाते. अनेकदा याकडे गाढ झोपेचे लक्षण म्हणूनही पाहिले जाते किंवा विनोदाचा विषय होते. मात्र विज्ञानानुसार, प्रत्येक वेळी घोरणे हे सामान्य असतेच असे नाही. झोपेत मोठ्याने घोरणे आणि काही सेकंदांसाठी श्‍वास पूर्णपणे कोंडला जाणे हा एक गंभीर आजार असू शकतो, ज्याला ‘ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲप्निया’ (ओएसए) म्हणतात. हा आजार रात्रीच्या शांततेत शरीरातील ऑक्सिजनची पातळी अचानक कमी करतो, ज्याचा ताण थेट हृदय आणि मेंदूवर पडतो. आजच्या बदलत्या जीवनशैलीत या सुप्त आजाराविषयी योग्य माहिती असणे गरजेचे आहे.

स्लीप ॲप्निया म्हणजे नेमकी कोणती स्थिती असते?

स्लीप ॲप्निया हा झोपेशी संबंधित एक तीव्र न्यूरो-मस्क्युलर आजार आहे. झोपेत असताना गळ्याच्या भागातील स्नायू प्रमाणापेक्षा जास्त शिथिल होतात, त्यामुळे हवेची नळी काही काळासाठी पूर्णपणे किंवा अंशतः बंद होते. परिणामी फुप्फुसांपर्यंत हवा पोहोचण्यात अडथळा निर्माण होतो आणि श्‍वास १० ते ३० सेकंदांसाठी पूर्णपणे थांबतो. श्‍वास थांबल्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी अचानक खालावते. अशा वेळी मेंदू जागृत होतो आणि व्यक्ती दचकून जागी होते. मग पुन्हा श्‍वास घेण्यास सुरुवात करते. ही प्रक्रिया एका रात्रीत शेकडो वेळा घडू शकते, ज्याची जाणीवही होत नसते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com