BirthdayPlanningsakal
साप्ताहिक
Premium|BirthdayPlanning: वाढदिवस, नियोजन आणि आम्ही
Kids Birthday: वाढदिवस हा आमचाच असतो, पण नियोजनाचा संपूर्ण ताबा आमच्या आईकडे! तिच्या वर्षभराच्या प्लॅनिंगची मजेशीर कहाणी – हसवणारी आणि विचार करायला लावणारी.
अवनीवाच्या गोष्टी । मैत्रेयी पंडित-दांडेकर
कोणत्याही कार्यक्रमाची पूर्वतयारी साधारण आठवडा किंवा महिनाभर आधी सुरू होते. पण मम्मा आमच्या वाढदिवसाच्या पूर्वतयारीची पूर्वतयारी ३६४ दिवस आधी सुरू करते. सर्वप्रथम वाढदिवसाचा पाया म्हणजे ‘थीम’ ठरवली जाते. नियोजन किती कमी अथवा किती जास्त हे वाढदिवसाच्या थीमवर ठरतं. त्यामुळे थीमसाठी मम्मा आणि आमची बरीच घासाघीस, भांडणं, रुसवेफुगवे होतात.