Premium|Oldest Marathi Inscription : मराठी भाषेच्या प्राचीन इतिहासाचा पुरावा; श्रवणबेळगोळातील शिलालेख काय सांगतो?

Shravanabelagola Gomateshwara Statue : श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या पुतळ्याच्या पायाशी कोरलेला शिलालेख मराठी भाषेच्या प्राचीन इतिहासातील महत्त्वाचा पुरावा मानला जातो. चामुंडराज आणि गंगराज यांच्या उल्लेखातून शिल्पनिर्मितीचा इतिहास उलगडतो.
Konark Temple Workers

Konark Temple Workers

esakal

Updated on: 

डॉ. नागनाथ बळते

शिलालेखातील पहिली ओळ चामुंडराजाविषयी असून, त्याने हे शिल्प करविले असल्याचे त्यात म्हटले आहे - ‘श्री चावुण्डराजें करवियलें’. दुसरी ओळ गंगराजाविषयी असून, त्याने या शिल्पाभोवती ‘सुत्ताले’ म्हणजेच तट किंवा कोट उभारल्याचा उल्लेख आहे - ‘श्रीगंगराजे सुत्ताले करवियलें’. हेच लेख हळेकन्नड आणि तमिळ भाषांमध्ये कोरलेले आहेत.

मराठी भाषेतील पहिला समजला जाणारा हा शिलालेख म्हैसूर राज्यातील हसन जिल्ह्यातील चेन्नरायपटण तालुक्यातील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या पुतळ्याच्या पायाशी कोरलेला आहे. बेळगोळ या नावाची आणखी दोन गावे - हळे बेळगोळ आणि कोडी बेळगोळ - म्हैसूर प्रांतातच आहेत. नामसादृश्यामुळे घोटाळा होऊ नये, म्हणून हे गाव ‘श्रवणबेळगोळ’ या नावाने ओळखले जाते. श्रवणबेळगोळ म्हणजे श्रमणांचे, अर्थात जैन साधूंचे बेळगोळ. गावाच्या मध्यभागी एक सुंदर तळे असून ‘बेळगोळ’ हे ग्रामनाम या तळ्यावरून सिद्ध झाले असावे. या गावाचा उल्लेख प्राचीन शिलालेखांतून वेळगोळ, बेळगुळ, बेलुगुळ अशा विविध स्वरूपांत आढळतो; मात्र ‘बेळगोळ’ हे त्याचे सर्वमान्य नाव आहे. श्रवणबेळगोळास ‘गोम्मटपूर’ किंवा ‘दक्षिण काशी’ या नावानेही ओळखले जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com