कोण असतात ऑन फिल्ड फिजिओथेरपिस्ट?

खेळाडूंचा फिटनेस आणि फॉर्म राखण्यासाठी खेळाडूंबरोबर सपोर्ट स्टाफची टीम असते. या टीममध्ये कोचबरोबरच इतर डॉक्टर, मानसतज्ज्ञ यांच्याबरोबरच ऑन फिल्ड फिजिओचाही समावेश होतो. ही संपूर्ण टीम खेळाडूंचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
Sports Physiotherapy
Sports Physiotherapy sakal

ऑन फिल्ड फिजिओथेरपिस्टचा खेळाडूच्या यशामध्ये खूप मोठा वाटा असतो. खेळाडूंच्या दुखापतीची चाचणी करून त्या दुखापतीचे कारण शोधून काढणे, त्यासाठी उपचार काय करता येतील याचे नियोजन करणे व त्यावर उपचार करणे यामध्ये ऑन फिल्ड फिजिओथेरपिस्टचा प्रामुख्याने सहभाग दिसतो.

डॉ. अदिती डोळे

खेळाडूंचा फिटनेस आणि फॉर्म राखण्यासाठी खेळाडूंबरोबर सपोर्ट स्टाफची टीम असते. या टीममध्ये कोचबरोबरच इतर डॉक्टर, मानसतज्ज्ञ यांच्याबरोबरच ऑन फिल्ड फिजिओचाही समावेश होतो. ही संपूर्ण टीम खेळाडूंचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

खेळाडूंसाठी लागणाऱ्या फिजिओथेरपीमध्ये प्रामुख्याने दोन प्रकार दिसतात. एका प्रकारात खेळाडूंना मैदानावर होणाऱ्या दुखापतींवर लगेच मैदानावरच उपचार केले जातात. यामध्ये प्रथमोपचार तसेच काही विशिष्ट पद्धतीने उपचार करून दुखापत शमवण्याचा प्रयत्न केला जातो.

मैदानात उपचार करताना खेळाच्या नियमांमध्ये बसेल असेच उपचार केले जातात. या प्रकारच्या फिजिओथेरपीला ‘ऑन फिल्ड फिजिओ’, म्हणजेच मैदानावर होणारी फिजिओथेरपी म्हणतात. आणि या प्रकारच्या उपचारांमध्ये तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांना ‘ऑन फिल्ड फिजिओथेरपिस्ट’ असे म्हणतात.

दुसऱ्या प्रकारातले फिजिओथेरपिस्ट क्लिनिकल सेट अपमध्ये किंवा रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना फिजिओथेरपी देतात. खेळाडूंना झालेली दुखापत पूर्ण बरी करून त्यांना पुन्हा खेळण्यासाठी तंदुरुस्त

करणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी असते. ऑन फिल्ड फिजिओथेरपिस्टचा खेळाडूच्या यशामध्ये खूप मोठा वाटा असतो. खेळाडूंच्या दुखापतीची चाचणी करून त्या दुखापतीचे कारण शोधून काढणे, त्यासाठी उपचार काय करता येतील याचे नियोजन करणे व त्यावर उपचार करणे यामध्ये ऑन फिल्ड फिजिओथेरपिस्टचा प्रामुख्याने सहभाग दिसतो.

फिजिओथेरपिस्टची भूमिका

  • दुखापत होऊ नये यासाठी उपाययोजना करणे

  • खेळाडूंना दुखापत होऊच नये यासाठी विशिष्ट प्रकारचे व्यायाम व तंत्राचा वापर करून उपचार करणे.

  • खेळाचा हंगाम चालू होण्याअगोदर स्नायूंमधील असमतोल व त्रास शोधून काढणे व त्यासाठी उपाय देणे.

  • तपासणी करणे

  • खेळ खेळताना होणाऱ्या दुखापतींची जलद तपासणी व त्याचे निदान; तसेच ट्रेनिंग सेशनच्यावेळी होणाऱ्या दुखापतींची चाचणी व निदान करणे.

  • दुखापतीच्या तीव्रतेची तपासणी करणे आणि त्या खेळाडूने पुन्हा खेळावे की नाही याचा निर्णय घेणे, किंवा त्या विशिष्ट सीझनमध्ये तो खेळाडू खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे की नाही याचा निर्णय देणे.

  • इमर्जन्सी केअर पुरवणे

  • फ्रॅक्चर (हाड मोडणे) होणे, सांधा निखळणे, डोक्याला मार लागणे अशा घटना घडल्यास प्रथमोपचार देणे.

  • दुखापतीनंतर इतर डॉक्टर व वैद्यकीय तज्ज्ञांबरोबर संवाद साधून खेळाडूला हवी ती वैद्यकीय सुविधा पुरवणे.

  • खेळाडूला पुन्हा खेळण्यायोग्य करणे

  • दुखापत झालेल्या खेळाडूंची रिकव्हरी चांगली व्हावी यासाठी पुनरागमन कार्यक्रम -रिहॅबिलिटेशन प्रोग्रॅम तयार करणे, त्यानुसार खेळाडूंकडून व्यायाम करून घेणे. असा प्रोग्रॅम आखताना पुन्हा इजा होणार नाही, याची खबरदारी घेतली जाते.

  • कोच व फिजिशियन यांच्यासोबत चर्चा करून खेळाडू पुन्हा खेळू शकतो का, हे ठरवणे.

  • खेळाडूला पुन्हा खेळण्यासाठी परवानगी देण्याआधी खेळाडूचा फिटनेस आणि दुखापती, तसेच तो पूर्वीच्या क्षमतेने खेळू शकतोय का नाही याची पडताळणी करणे.

  • ट्रेनिंग देणे

  • खेळाडूला वॉर्म अप, कूल डाउन, स्ट्रेचिंग या गोष्टींचे महत्त्व पटवून ते शिकवणे. त्याशिवाय इंज्युरी प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजी, आहार आणि रिकव्हरी मेथडबद्दल माहिती देणे.

  • नोंदी ठेवणे

  • खेळाडूला झालेल्या दुखापतींची, तसेच त्या दुखापतींवर काय उपचार केले या सर्व माहितीच्या नोंदी ठेवणे.

ऑन फिल्ड फिजिओ समोरची आव्हाने

अतितणावपूर्ण वातावरण : ऑन फिल्ड फिजिओला अतितणावपूर्ण वातावरणात काम करावे लागते. तणावपूर्ण परिस्थितीत पटकन आणि अचूक निर्णय घेण्याची गरज असते. त्याच्या प्रत्येक निर्णयाचा परिणाम खेळाडूच्या करिअरवर आणि तब्येतीवर होऊ शकतो.

वेळेचे बंधन : खेळादरम्यान किंवा स्पर्धेदरम्यान मिळालेल्या थोड्याशा वेळेत खेळाडूची दुखापत तपासून त्यावर उपचार करणे हे एक मोठे आव्हान असते. कुठल्या खेळाडूला त्वरित उपचार करावे लागणारेत किंवा तपशीलवार तपासणीची गरज आहे, हे कमी वेळात ठरवावे लागते.

टीमबरोबर समन्वय : सर्व कोच, खेळाडू आणि इतर वैद्यकीय संघाबरोबर सतत वेळच्यावेळी समन्वय साधून चर्चा करून त्यानुसार खेळाडूचा प्रोग्रेस प्लॅन तयार करणे आव्हानात्मक असू शकते, कारण खेळाडूच्या अनेक गोष्टी सांभाळून हे करावे लागते.

व्यायामात सातत्य : दिलेल्या व्यायामात खेळाडू सातत्य ठेवतात का, हे बघणे आव्हानात्मक असते. खेळाडू स्वतःच ठरवून किंवा इतर कोणाचा बघून व्यायाम करत नाहीये ना किंवा स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करत नाहीये ना, याकडे लक्ष द्यावे लागते. काहीवेळा दुखापतीनंतर पुन्हा खेळण्याची काही खेळाडूंना घाई असते, अशा वेळी त्यांना समजावणे आव्हानात्मक असू शकते.

अपडेट राहणे : स्पोर्ट्‌स मेडिसिन आणि फिजिओथेरपीमधील नवीन संशोधन आणि तंत्र याबाबत नेहमी अद्ययावत राहणे, हे सर्वोत्तम उपचार करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. परंतु त्यासाठी सातत्याने नवीन गोष्टी शिकत राहणे आवश्यक आहे.

प्रवास आणि जास्त तास काम करणे : ऑन फिल्ड फिजिओथेरपिस्टना क्रीडा संघांसह/खेळाडूसह मोठ्या प्रमाणावर प्रवास करावा लागू शकतो. स्पर्धात्मक हंगामात अनियमित वेळापत्रक असते आणि जास्त तास काम करावे लागते.

भावनिक ताण : क्रीडापटूंच्या भावनांना सामोरे जाणे, विशेषतः जेव्हा ते दुखापतींमुळे बाजूला होतात, तेव्हा त्यांच्या भावना सांभाळून, त्यांना समजून घेऊन त्यांच्यावर उपचार करावे लागतात.

इतकी आव्हाने असूनही ऑन फिल्ड फिजिओथेरपिस्ट खेळाडूंचे आरोग्य आणि चांगली कामगिरी राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, खेळाडूंच्या एकूण यशात महत्त्वपूर्ण योगदान देतात.

---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com