व्यायामाची साथ । डॉ. वर्षा वर्तक
आयुष्यभर मी नियमितपणे व्यायाम केला, जोर-बैठका मारल्या, सूर्यनमस्कार घातले, न चुकता सकाळी चालायला जातो. तरीही आता सत्तरीनंतर सांधे, हातापायांचे स्नायू आखडतात, थोडे कडक होऊ लागले आहेत. असं का होतं? यावर काही उपाय आहे का?
वयाप्रमाणे सांध्यांची झीज होणं अपरिहार्य असतं. त्याचबरोबर शरीरातल्या आणि स्नायूंमधल्या पाण्याचं प्रमाण कमी होऊ लागतं. त्यामुळे स्नायू कडक होतात. त्यामुळे या वयात शरीरातल्या पाण्याचं आणि क्षारांचं योग्य संतुलन राखणं जास्त गरजेचं असतं.