share market

share market

Esakal

Premium|Share Market: भारत-अमेरिका संबंधांतील तणावामुळे शेअर बाजारात अस्थिरता, गुंतवणूकदारांनी काय करावे?

stock market: शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांच्या चिंता वाढल्या, काय आहेत उपाय?
Published on

भूषण महाजन

आमच्या भाकिताप्रमाणे आता शेअर बाजारातील जोखीम/ परतावा आकर्षक झाला आहे. निफ्टी येथून पाच टक्के खाली जाऊ शकते व किमान १३ ते १५ टक्के वर जाऊ शकते. जीएसटी दर उद्योगांच्या मनाप्रमाणे जाहीर झाल्यास हिरो, टीव्हीएस, आयशर, महिंद्र, मारुती ह्या वाहन कंपन्या रडारवर ठेवाव्यात. दुसरा पर्याय म्हणजे ऑटोबीस नावाचा ईटीएफ घेता येईल.

ऑगस्टच्या शेवटच्या सप्ताहातील तेजी अल्पजीवी ठरली आणि पुन्हा उत्साह घालवणाऱ्या बातम्यांचे निमित्त होऊन सारेच निर्देशांक खाली आले. निफ्टी व सेन्सेक्स सप्ताहात प्रत्येकी १.७५ टक्के खाली आले. पुन्हा आठवड्याचा बंद सर्वात खालच्या पातळीवर झाला. हे काही फारसे चांगले लक्षण नव्हे.

गेल्या वर्षभराचा आढावा घेतल्यास बरोबर एका वर्षापूर्वी २९ ऑगस्ट २०२४ रोजी निफ्टी २५१५१ व सेन्सेक्स ८२१३४ अंशावर होते. वर्षभरात दोन्ही निर्देशांक प्रत्येकी २.८ टक्क्यांनी खाली आले आहेत. स्मॉल कॅप निर्देशांक तर ८.६ टक्के व निफ्टी ५०० निर्देशांक पाच टक्के खाली आहेत. ही वाताहत होण्याची कारणे आम्ही पुन्हा पुन्हा सांगत आहोत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com