

Women operated radio stations worldwide
esakal
अरविंद रेणापूरकर
महिलांनी महिलांसाठी चालवलेली रेडिओ स्टेशन्स ही केवळ माहिती देणारी साधने नसून, सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरत आहेत. जगातील अनेक देशांमध्ये या माध्यमांनी महिलांना स्वतःचा आवाज, ओळख आणि हक्कांची जाणीव करून दिली आहे. अफगाणिस्तानातील रेडिओ बेगम हे आदर्श उदाहरण आहे.
द रवर्षी जागतिक महिला दिन जगभरात उत्साहात साजरा केला जात असताना, अफगाणिस्तानसारख्या कट्टर शासकांच्या राजवटीत असणाऱ्या महिलांच्या हक्कांबाबत फारसा आवाज उठविला जात नाही. अर्थात अफगाणिस्तानात गेल्या काही वर्षांत तालिबान शासकांकडून महिलांवरील निर्बंध झपाट्याने वाढले आहेत. शिक्षण, नोकरी, सार्वजनिक वावर, प्रत्येक क्षेत्रात महिलांची उपस्थिती या गोष्टींना मर्यादा घालण्याचा प्रयत्न होत असताना, अशा कठीण काळात रेडिओ बेगम हे माध्यम अफगाणिस्तानच्या महिलांसाठी आशेचा किरण ठरले आहे. हे केवळ एक रेडिओ स्टेशन नसून, महिलांचा आवाज, त्यांचे हक्क आणि त्यांची स्वप्ने जपणारे व्यासपीठ आहे.