

wildlife conservation India
esakal
महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये बिबट्या या जंगली प्राण्याची घुसखोरी, त्यातून नागरिकांच्या व पाळीव प्राण्यांच्या जीवाला निर्माण झालेला धोका, बिबट्यांना पकडण्यासाठीच्या विविध क्लृप्त्या आणि ते शहरांत येऊच नाहीत यासाठीच्या उपाययोजनांची जोरदार चर्चा आहे. मुळात मानवाने जंगली प्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण केले व त्यामुळे ते वन्यजीव शिकार मिळवण्यासाठी, आपले पोट भरण्यासाठी शहराकडे येत आहेत, या मूळ मुद्द्यालाच सोईस्करपणे बगल दिली जात आहे. मानवाने जंगलांवरची अतिक्रमणे रोखणे, प्राण्यांचा अधिवास कायम ठेवणे हा त्यावरचा उपाय सोडून जंगलात शेळ्या सोडणे, बिबट्यांना दिसताक्षणी गोळ्या घालणे, त्यांचे प्रजनन रोखण्यासाठी उपाय आखण्यासारखे सोपे उपाय प्रशासन व सरकार शोधत असून, यातून भविष्यात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याचीच चिन्हे दिसत आहेत.