

RBI Repo Rate Cut
esakal
थोडा संयम दाखवल्यास व मालमत्ता वर्गीकरण आणि लार्ज कॅपमधील निवडक गुंतवणूक आत्मविश्वासाने केल्यास पुढील १८ महिन्यांत किमान २० टक्के परतावा मिळावा. ह्याआधीही अमेरिकेने निर्बंध लादले होते व ते आव्हान आपण पेलले होते. आता व्यापार वाढला आहे, वेळ लागेल पण आपल्या सामर्थ्यावर आपण तरून जाऊ असे दिसते.
एखाद्या गल्लीतल्या आजारी गाढवाला काबूत आणण्याचा प्रयत्न करावा, त्याला जवळ घेऊन औषधोपचार करण्याचा प्रयत्न करावा आणि त्याने मात्र जवळ येताच दुगाण्या झाडून आपल्याला आडवे पाडून पोबारा करावा तसे काही तरी होत आहे. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था आपल्या शेअर बाजाराची आहे. लार्ज कॅप/मिडकॅपमधील चांगली कामगिरी करणारे आणि वाढत असलेले शेअर घ्यावे, तर नेमका कुणीतरी मोठा भागधारक येतो आणि स्वतःचा शेअरचा काही हिस्सा विकून जातो.