

Red Flags and Green Flags in Relationships
esakal
आजच्या युगात तरुणांची नात्याकडे पाहण्याची दृष्टी अधिक जागरूक झाली आहे. प्रेम, आकर्षण आणि संवाद यापलीकडे आता ते नात्याच्या आरोग्याचे ‘संकेत’ ओळखू लागले आहेत. या संकेतांनाच हल्लीच्या भाषेत ‘रेड फ्लॅग’ आणि ‘ग्रीन फ्लॅग’ म्हणतात. काही रेड आणि ग्रीन फ्लॅग्ज कॉमन असतात, जे सगळ्यांनाच खटकतात किंवा पटतात. तर, काही फ्लॅग्ज व्यक्तीसापेक्ष असतात.
रेल्वे स्टेशनवरून सुटण्याची वेळ झाली, की स्टेशनमास्तर हिरवा झेंडा दाखवतो. हा एक इशाराच असतो - सर्व प्रवासी सामानासह चढले आहेत, पुढचा रस्ताही सुरळीत आहे आणि रेल्वे आता मार्गस्थ होऊ शकते. हिरवा झेंडा मिळाल्यावरच रेल्वे सुटते. पण कधीकधी कुठेतरी आडमार्गाला स्टेशनमास्तर अचानक लाल झेंडा फडकवतो आणि रेल्वे जिथल्या तिथं थांबते. लाल झेंडा म्हणजे ‘थांबा! पुढे धोका आहे! पुढे जाऊ नका!’ अशा परिस्थितीत धोका आधीच कळल्यामुळे प्रवाशांवरील संकट टळतं आणि नंतर प्रवास सुखकर होतो.