Premium|Skin Care Tips : तेलकट त्वचेसाठी सोपे घरगुती फेस पॅक टिप्स

Natural Beauty Remedies : वाढते वय, प्रदूषण आणि हार्मोनल बदलांमुळे त्वचेवर होणारे परिणाम रोखण्यासाठी घरगुती फेस पॅक आणि योग्य दिनचर्या पाळल्यास त्वचा नितळ व फ्रेश राहण्यास मदत होते.
Skin Care Tips

Skin Care Tips

esakal

Updated on

स्वप्ना साने

टीनएजमध्ये मुरूम येणे साहजिक आहे, पण नंतरही त्वचेवर मुरूम येत असतील, तर ते तेलकट त्वचेमुळे आणि काळजी न घेतल्यामुळे असू शकते किंवा स्ट्रेसमुळे अथवा पचनक्रिया व्यवस्थित नसेल, तरीही मुरूम येऊ शकते. अशावेळी एकदा तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

टवटवीत, तजेलदार, नितळ, कोमल त्वचा  प्रत्येकालाच हवी असते. टीनजएर्स असोत अथवा मोठी माणसं, हेल्दी आणि ग्लोइंग स्किन असावी ह्यासाठी अनेकजण असंख्य प्रयत्न करत असतात.

लहान असेपर्यंत त्वचा कोमल असते, पण जसजसे टीनएजमध्ये पदार्पण होते, तसतसे त्वचेमध्ये बदल जाणवू लागतात - पिंपल्स, ब्लॅक व व्हाइट हेड्स येतात; स्किनवर रफनेस, पॅचिनेस जाणवतो; डार्क स्पॉट्स दिसायला लागतात. हे सारे बदल शरीरात हार्मोनल बदल घडत असल्यामुळे त्वचेवर दिसून येतात. तसेच, वयाच्या तिशीनंतर त्वचा डल होणे, पिगमेन्टेशन होणे, रिंकल्स दिसणे याची सुरुवात जाणवायला लागते. चाळिशीनंतर परत हार्मोनल बदल व्हायला सुरुवात होते, त्यामुळे त्वचा आणखी  खराब दिसू लागते. त्यात ऋतू बदलल्यावर तर त्वचेमध्येदेखील सारखे बदल होतच असतात. कधी कोणाची त्वचा मूलतःच नितळ, बेदाग आणि कोमल असते. पण प्रदूषण आणि कामाच्या ताणामुळे कमी वयातच एजिंग साइन्स दिसायला लागतात. ह्या सगळ्या समस्यांसाठी काही सोप्या घरगुती टिप्स फॉलो केल्या, तर त्वचा बऱ्यापैकी हेल्दी दिसू शकते.

Skin Care Tips
Premium|Life Insurance Claim Rejection Concealment : 'परम विश्वास' तत्त्वाच्या भंगाने क्लेम नामंजूर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com