
चिन्मय आलुरकर
असं म्हणतात स्त्रीच्या हातात जर सुई-धागा दिला तर ती त्याचं सुंदर कापड विणेल, धान्य दिलं तर उत्तम स्वयंपाक करेल, विटा दिल्या तर भक्कम घर बांधेल आणि पंख दिले तर ती संपूर्ण आकाश व्यापून टाकेल! महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील उद्योजिकांनी त्यांना मिळालेल्या अशाच एका संधीचं खऱ्या अर्थानं सोनं केलं. शासनाच्या एमएसआरएलएमअंतर्गत (MSRLM - Maharashtra State Rural Livelihoods Mission) ‘उमेद’ या अभियानाने ग्रामीण भागातील महिला उद्योजिकांची बायर-सेलर मीट मुंबईत आयोजित केली होती.