Premium|Shah Rukh Khan Kajol Bollywood Songs : ‘मेरे ख्वाबों में’पासून ‘तुझे देखा तो’पर्यंतचा राजकन्यांचा बॉलिवूड प्रेमप्रवास

Cultural influence of Indian cinema abroad : बॉलिवूडची जादू ‘मेरे ख्वाबों में’पासून ‘तुझे देखा तो’पर्यंत शाहरुख-काजोलच्या गाण्यांनी भारावलेल्या दोन बहिणी.
Shah Rukh Khan Kajol Bollywood Songs

Shah Rukh Khan Kajol Bollywood Songs

esakal

Updated on

मैत्रेयी पंडित-दांडेकर

झिपरे ‘शायुक खा’ काका वेळ, काळ, ऊन, मून, पाऊस, हाऊस, देश, वेष यापैकी कशालाही न जुमानता आरडाओरडी करत फुटबॉल तुडवत प्रकट होतात. पाठोपाठ टॉवेल गुंडाळलेल्या ‘काजोय काकू’ पलंग आणि परसदारात आलटून पालटून उड्या मारत नाचत अवतरतात. याआधी असलं काहीही कधीही न पाहिलेल्या, हिंदीचा ओ की ठो न कळणाऱ्या दोघी राजकन्या हा नाच(?) आणि हे गाणं बघून अक्षरशः मंत्रमुग्ध होतात, प्रेरित होतात आणि अतिशय भारावून जातात.

तर या गोष्टीची सुरुवात फ्लॅशबॅकपासून होते. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा आणि राणी त्यांच्या दोन राजकन्यांबरोबर नांदत असत. सगळं सुरळीत सुरू असताना त्यांच्यावर कोरोनाचा कोप होतो आणि या चौघांना पंधरा दिवस एकत्र घरकैदेत बसावं लागतं. एक राजकन्या दीड वर्षाची आणि दुसरी साडेपाच. दोघींचं स्क्रीनशिवाय सतत मनोरंजन करणं म्हणजे राजा-राणीची सत्वपरीक्षा! पहिल्या चार दिवसांत सगळे घरगुती खेळ संपतात आणि खेळवून थकलेले राजा-राणी शेवटी स्क्रीनच्या बळी पडतात. पुढचे दोन दिवस कोकोमेलन, बेबी शार्क असल्या इंग्रजी बडबडगीतांची दोघी राजकन्या पारायणं करतात. ही गाणी ऐकून राणीचे कान विटतात, मान दुखते आणि मग तिला भान येतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com