केदार देशमुख
केंद्र शासनाने २०१४पासून माती परीक्षणाचे धोरण अमलात आणले आहे. या पाहणीतून संकलित केलेली माहिती देशात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. विशेषतः हवामानातील बदलानुसार धोरणात्मक निर्णय घेणे, शेतकऱ्यांच्या पीक पद्धतीत बदल करण्यासाठी आणि शाश्वत विकास साध्य करण्यासाठी शासकीय पातळीवर पावले उचलण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
मानवी सभ्यतेचा आणि मृदा अर्थात मातीचा घनिष्ठ संबंध आहे. ज्या मातीतून पर्यावरणाचा विकास झाला, त्या मातीचे संरक्षण करण्याचे, मातीचे आरोग्य सांभाळण्याचे काम प्रत्येकाचे आहे.
मातीचे महत्त्व पटवून देणे, मातीचे आरोग्य आणि मानवी जीवन यांचा अन्योन्य सहसंबंध कसा आहे आणि बदलत्या हवामानाचा मातीच्या आरोग्यावर झालेल्या परिणामांची चर्चा घडवून आणणे हा प्राथमिक उद्देश ठेवून दरवर्षी ५ डिसेंबरला ‘जागतिक मृदा दिन’ साजरा केला जातो. जागतिक मृदा दिन हा उपक्रम सुरू होऊन यावर्षी दहा वर्षे पूर्ण झाली आहेत.