Work Life Balance करताना Positive राहा... दृष्टिकोन बदलल्यामुळे इतके फायदे, संशोधातून माहिती समोर

काही छोट्या छोट्या उपायांनी आपलं रोजचं तेच ते वाटणारं कामंही आनंददायी करता येऊ शकतं
work life balance
work life balanceEsakal

केतकी जोशी

मस्त प्रसन्न सकाळ, हातात चहाचा किंवा कॉफीचा कप, आवडतं पुस्तक, म्युझिक आणि पुढ्यातला आरामशीर दिवस. कुणाला आवडणार नाही असा दिनक्रम? पण असं नसतं ना! आपल्याला रोज सकाळी उठून कामावर जावंच लागतं.

नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्या महिला असोत किंवा घरातून काम म्हणजे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या महिला असोत किंवा स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या महिला असोत; अगदी गृहिणी असल्या तरी रोजच्या दिनक्रमाचा कंटाळा येतोच. कधीकधी सगळं सोडून कुणालाही न सांगता एखाद्या जंगलात निघून जावं असंही कित्येकदा वाटतं.

पण पुन्हा कामावर परतावंच लागतं. हे रुटीन नक्कीच थकवणारं असतं. मग त्याच रुटीनची कटकट वाटून घेण्यापेक्षा आपलं कामच आनंददायी केलं तर? म्हणजे आपल्याला रोज हे काम करावंच लागणार आहे, हे लक्षात घेऊन कामाच्या ठिकाणचं वातावरण आपल्या प्रयत्नांनी आनंददायी ठेवलं, तर आपली चिडचिड, वैताग नक्की कमी होईल आणि कामातूनही एक वेगळाच आनंदही मिळेल.

आता कामाच्या बाबतीत खासगी कार्यालयांमध्ये उच्च स्तरावर किंवा अगदी सरकारी कार्यालयांमध्येही स्त्री-पुरुष असा भेदभाव सहसा केला जात नाही. त्यामुळे त्याच्याबरोबर येणारं राजकारण, ताण, चढाओढ याचाही महिलांनाही सारख्याच प्रमाणात सामना करावा लागतो.

काम करण्याबरोबरच या सगळ्या बाबी मानसिकरित्या थकविणाऱ्या असतात. या सगळ्यावर मात करणं सोपं नाही, पण मनात आणलं तर अशक्यही नाही.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या कामाच्या ठिकाणी, उदाहरणार्थ ऑफिसमध्ये जातानाच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जा. ‘रोज रोज काय तेच करायचं’ याऐवजी ‘हे माझं आवडतं काम आहे किंवा आज काहीतरी आणखी चांगलं काम करूया,’ असा दृष्टिकोन ठेवला तर त्यानं तुमच्या मानसिक आरोग्यावरही अत्यंत सकारात्मक परिणाम होतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com