

Gym Fitness Myths
Sakal
प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. जिममधील व्यायामाला वयाचे कोणतेही बंधन नाही. ज्याला निरोगी राहायचे आहे, दीर्घायुषी व्हायचे आहे, त्या सर्वांनी योग्य व्यायाम करणे गरजेचे आहे.
म??? नको रे बाबा! सोडलं की वजन वाढतं...’, ‘जिम फक्त पुरुषांसाठी; बायकांनी फक्त चालणं किंवा योगासनं असले व्यायाम करावेत...’, ‘जिम म्हणजे डाएट करणं आलं...’ असे अनेक गैरसमज जिमच्या बाबतीत बघायला मिळतात. इंटरनेटवर अनेक व्यायाम प्रकार आणि माहितीही मिळते. पण काही वेळेस ती माहिती पुरेशी असतेच असे नाही किंवा ही माहिती संभ्रमातही टाकते. त्यामुळे मग असे गैरसमज निर्माण होतात.