Premium|Supreme Court Haircut Compensation Case : चुकीच्या हेअरकटवरून पाच कोटींचा दावा; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

Consumer Court Compensation Dispute : चुकीच्या हेअरकटमुळे करिअर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचा दावा करणाऱ्या मॉडेलच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नुकसानभरपाईबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवत ग्राहक मंचांच्या कार्यपद्धतीवरही भाष्य केले.
Consumer Court Compensation Dispute

Consumer Court Compensation Dispute

esakal

Updated on

ॲड. रोहित एरंडे

तब्बल पाच कोटी २० लाख रुपयांची केस २५ लाख रुपयांवर मिटली! यात तक्रारदाराच्या जिद्दीचे कौतुक करायचे, की न्यायव्यवस्था लवचिक आहे म्हणायचे, हे कळत नाही. असो. आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल, की लहानपणी घरातले मोठेच नेहमीच्या न्हाव्याला सांगून ठेवायचे, की केस बारीकच कापले पाहिजेत, तेव्हा ‘मानसिक धक्का’ हे शब्दसुद्धा आपल्याला माहिती नव्हते, नाही का!

भारताच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत कोणकोणते विषय जाऊ शकतात याची जंत्री काढणे हाच एक संशोधनाचा विषय होईल. कोणाचे काय तर कोणाचे काय असे म्हणतात. अशाच एक मजेशीर खटल्यावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक निकाल दिला. ही केस सुरू होते २०१८मध्ये. आयआयएम कोलकाता येथील पदवीधर असलेली आणि नंतर मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये गेलेली आशना रॉय नावाची मॉडेल नवी दिल्लीमधील आयटीसी मौर्य या पंचतारांकित हॉटेलमधील ब्यूटी पार्लरमध्ये केस कापण्यासाठी आली होती. मात्र तिला पाहिजे तसे केस कापले गेले नाहीत, हेअर स्टायलिस्टने तिच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आणि केस पाहिजे तेवढे छोटे कापले नाहीत; शिवाय नंतर घेतलेल्या हेअर ट्रीटमेंटमुळे तिच्या टाळूला दुखापत झाली. या सर्व सेवांतील त्रुटींसाठी आणि वैद्यकीय निष्काळजीपणासाठी आशनाताईंनी थेट राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे तब्बल दोन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईसाठी दावा केला. तो २०२१मध्ये मान्य झाला. हा दावा मान्य करताना राष्ट्रीय आयोगाने नमूद केले, की चुकीच्या हेअरकटमुळे महिलांना नैराश्य येऊ शकते आणि त्याचा परिणाम मॉडेलिंगसारख्या क्षेत्रातील करिअरवर होऊ शकतो. अर्थातच हॉटेलने या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर निर्णय देताना सेवेतील कथित त्रुटीसाठीच्या निर्णयात हस्तक्षेप न करता, सर्वोच्च न्यायालयाने दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई अवाजवी ठरवून, योग्य नुकसान भरपाई ठरविण्यासाठी प्रकरण परत आयोगाकडे वर्ग केले.

Consumer Court Compensation Dispute
Premium|Artificial Intelligence: कृत्रिम बुद्धिमत्तेचा धोकादायक खेळ; पिढीच्या भावनिक नात्यांवर संकट
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com