

किशोर पेटकर
इटलीचा अव्वल मानांकित टेनिसपटू यानिक सिनर याच्यावरील मोठी कारवाई टळली आहे. उत्तेजक द्रव सेवन (डोपिंग) प्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या हा २३ वर्षीय टेनिसपटू अल्प शिक्षेनिशी सुटला. फक्त तीन महिने निलंबनाची शिक्षा भोगून तो मे महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या फ्रेंच ओपन या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत खेळू शकेल.